Karnataka Assembly Election esakal
देश

Assembly Election : 'ही माझी शेवटचीच निवडणूक'; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं खेळलं निवडणुकीपूर्वी 'इमोशनल कार्ड'

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) अवघे काहीच महिने शिल्लक उरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सिद्धरामय्यांच्या आधी जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही भावनिक कार्ड खेळलंय.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) अवघे काहीच महिने शिल्लक उरले आहेत. काँग्रेस-भाजप आणि जेडीएससह सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केलीये.

याचदरम्यान, काँग्रेस नेते (Congress) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इमोशनल कार्ड खेळलंय. ही माझी शेवटची निवडणूक असेल, असं सिद्धरामय्यांनी स्पष्ट केलंय.

बिदरमध्ये सिद्धरामय्या (Siddaramaiah) म्हणाले, 'ही माझी शेवटचीच निवडणूक असेल. मात्र, मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. निवृत्तीनंतरही मी तुम्हा सर्वांना साथ देईन. कर्नाटकातील जनतेच्या आशीर्वादानं मला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. 2013-2018 दरम्यान मी 5 वर्षे मुख्यमंत्री राहिलो. देवराज उर्स हेही पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर पूर्ण पाच वर्षे सेवा करणारा मी एकमेव मुख्यमंत्री आहे.'

यापूर्वी एका जाहीर सभेत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले होते, सत्तेत आल्यानंतर जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकलो नाही तर, राजकारणातून संन्यास घेईन आणि घरी जाईन. मात्र, जनतेला दिलेली आश्वासनं पक्ष पूर्ण करेल, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. काँग्रेसच्या 'प्रजा द्वानी यात्रे'दरम्यान सभेला संबोधित करताना सिद्धरामय्या म्हणाले, 'सत्तेत आल्यास आम्ही 10 किलो तांदूळ देऊ. यापूर्वी आम्ही 200 युनिट मोफत वीज आणि महिलांच्या नेतृत्वाखालील घरांना 2,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलंय.'

Congress Leader Siddaramaiah

कुमारस्वामींनीही खेळलं 'इमोशनल कार्ड'

सिद्धरामय्यांच्या आधी जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही भावनिक कार्ड खेळलंय. कुमारस्वामी म्हणाले, माझे वडील हयात असताना मला दाखवून द्यायचं आहे की, जेडीएस अजूनही चालत आहे आणि हे सिद्ध करुन दाखवायचं आहे. देवेगौडांनी स्थापन केलेल्या पक्षाला 120 जागा जिंकून मला त्यांना भेट द्यायची आहे, असं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दाखल

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT