Dhirendra Krishna Shastri  esakal
देश

Dhirendra Shastri : 'बागेश्वर धाम'चे बाबा राजकारणात एन्ट्री करणार? शास्त्री म्हणाले, सत्ता मिळवून सरकार बनवणं..

भारत लवकरच हिंदू राष्ट्र होणार असल्याचा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

'भारत लवकरच हिंदू राष्ट्र होईल. आज आमच्या दरबारात परदेशातूनही लोक सहभागी होत आहेत.'

बागेश्वर धाम (Bageshwar Dham) सरकारचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी पुन्हा एकदा भारत लवकरच हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) होणार असल्याचा दावा केलाय.

'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना शास्त्री म्हणाले, 'भारत लवकरच हिंदू राष्ट्र होईल. आज आमच्या दरबारात परदेशातूनही लोक सहभागी होत आहेत. ते ख्रिश्चन धर्माचे असले तरी, सनातन धर्मावर त्यांचा विश्वास आहे.'

धीरेंद्र शास्त्री पुढं म्हणाले, 'याचा अर्थ असा की, परदेशी लोकांनाही असा भारत हवाय, जिथं प्रत्येकजण अभिमानानं हिंदुत्वाची चर्चा करू शकेल. जातीभेदाकडं दुर्लक्ष करा. कारण, आम्ही सगळे भारतीय आहोत. हिंदुस्थान म्हणजेच हिंदूंचं स्थान, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सत्ता मिळवून सरकार बनवणं हे आमचं उद्दिष्ट नाहीये. पण, जर कोणी आम्हाला पाठिंबा देऊ इच्छित असेल तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही सर्व हिंदूंनी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करतो. भारत लवकरच हिंदू राष्ट्र होईल, असंही शास्त्री म्हणाले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील एका संस्थेनं धीरेंद्र शास्त्रींना चमत्कार दाखविण्याचं आव्हान दिलं होतं. तेव्हापासून शास्त्री सतत चर्चेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT