Bihar CM Nitish Kumar launches the Women Employment Scheme to empower women through new job opportunities. esakal
देश

Nitish Kumar : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांची महिलांसाठी मोठी घोषणा, म्हणाले...

Bihar Women Employment Scheme: सप्टेंबर महिन्यापासून नव्या योजनेतून महिलांना लाभ मिळणे सुरू होणार आहे.

Mayur Ratnaparkhe

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आपल्या आवडीचा रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक सहकार्य प्रदान करण्याच्या हेतूने एक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, यासंबंधी एका प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महिलांच्या रोजगारासाठी 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजना' ही नवीन योजना आमच्या सरकारने मंजूर केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील सर्व कुटुंबातील एका महिलेला त्यांच्या आवडीचा रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे आहे.

याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, "मला विश्वास आहे की या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांचे स्थिती अधिक मजबूत होईलच, शिवाय राज्यात चांगल्या रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील आणि लोकांना मजबुरीने रोजगारासाठी राज्याबाहेर जावे लागणार नाही."

याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, "नोव्हेंबर २००५ मध्ये सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. आता महिला केवळ त्यांच्या कठोर परिश्रमाने बिहारच्या प्रगतीत योगदान देत नाहीत तर त्या त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती देखील मजबूत करत आहेत. हे अभियान पुढे नेत, आम्ही आता महिलांच्या हितासाठी एक महत्त्वाचा आणि अभूतपूर्व निर्णय घेतला आहे, ज्याचे सकारात्मक आणि दूरगामी परिणाम होतील.

महिलांना रोजगारासाठी आर्थिक मदत मिळणार-

१. 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजने' अंतर्गत, आर्थिक मदत म्हणून, सर्व कुटुंबातील एका महिलेला तिच्या पसंतीच्या रोजगारासाठी पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये दिले जातील.

 २.इच्छुक महिलांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. त्याची संपूर्ण व्यवस्था आणि प्रक्रिया ग्रामीण विकास विभाग निश्चित करेल आणि त्यासाठी गरजेनुसार नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाचे सहकार्य देखील घेतले जाईल.

 ३.सप्टेंबर २०२५ पासूनच ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

 ४.महिलांनी रोजगार सुरू केल्यानंतर ६ महिन्यांनी मूल्यांकन केल्यानंतर, गरजेनुसार दोन लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त मदत दिली जाऊ शकते.

 ५.राज्यातील गावांपासून शहरांपर्यंत महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हाट बाजार विकसित केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik: अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, गणेश नाईक यांचे आदेश

यंदाच्या विसर्जन मिरवणुका होणार डीजेमुक्त! पोलिस आयुक्त कारवाईबाबत सक्त, ‘डीजे’वाले वरमले; डीजेविरोधातील असंतोषाला वाट, दर तासाला ३०० सोलापूरकरांचे मिस कॉल

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Maratha Morcha : मुंबईतील मराठा मोर्चात ‘मुस्लिम मावळा’चे बॅनर झळकले

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

SCROLL FOR NEXT