Chirag Paswan and Jitan Ram Manjhi during recent Bihar NDA meeting — both leaders firm on their seat-sharing demands ahead of the 2025 election.
esakal
NDA Faces Tough Seat-Sharing Challenge Ahead of Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे आणि दोन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. यानंतर आता बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आम आदम पार्टीने स्वबळाचा नारा देत पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे, तर बहुजन समाज पार्टीही स्वबळावरच ही निवडणूक लढवणार आहे.
दुसरीकडे सत्ताधारी एनडीए आघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आधी चिराग पासवान नंतर आता जीतनराम मांझी हे जागांसाठी अडून बसल्याने, एनडीए आघाडीसमोर नवा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार, एनडीए आघाडीकडून जागा वाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले गेले होते. या बैठकीत चिराग पासवान यांच्या पाठोपाठ जीतनराम मांझी देखील आपल्या जागांची मागणी करत, त्यावरच अडून बसले आहेत. सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीतर यंदा निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका मांझी यांनी घेतली आहे.
हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे प्रमुख आणि केंद्रीयमंत्री जीतनराम मांझी यांच्या वक्तव्यामुळे एनडीए आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जर आमच्या पक्षाला १५ पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर आम्ही निवडणूक लढवणार नाही परंतु एनडीएमध्येच राहू.
त्यांच्या या विधानामुळे हे स्पष्ट होते की, एनडीए आघाडीत अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. तसेच मांझी यांनी असंही स्पष्ट केलं आहे की, या विषयावरील निर्णय त्यांच्या पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत घेतला जाईल.
जीतनराम मांझी यांनी एक्सवर एका खास शायरीद्वारे म्हणाले, “हो न्याय अगर तो आधा दो, यदि उसमें भी कोई बाधा हो, तो दे दो केवल 15 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, HAM वही ख़ुशी से खाएंगे, परिजन पे असी ना उठाएंगे.” जीतनराम मांझी यांची ही शायरी केवळ भावनात्मक संदेश देत नसून, एनडीए आघाडीच्या नेतृत्वास घटक पक्षाला सन्मान दिला जावा असाही संदेश देत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.