tejashwi-yadav 
देश

बिहार रणसंग्राम : डायर बनण्याची परवानगी कशी? तेजस्वी यांचा सवाल

सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा - बिहारमधील मुंगेर येथे दुर्गा विसर्जनाच्या वेळी सोमवारी (ता.२६) गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाला. या घटनेवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज हल्ला चढविला. ‘‘मुंगेरच्या पोलिसांना जनरल डायर बनण्याची परवानगी कोणी दिली?, असा प्रश्‍न करीत हा गोळीबार कोणाच्या तरी आदेशावरून झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी तेजस्वी यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ‘जनरल डायरप्रमाणे वागण्याची परवानगी मुंगेर पोलिसांना कोणी दिली?, असा सवाल त्यांनी नितीश कुमार व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना केला.

गोळीबारातील मृताच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करीत या घटनेवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय कारवाई करणार आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली. नितीश गृहमंत्रीही आहेत, त्यांना पोलिस काय करतील, याची सूचना मिळाली असेलच ना? उपमुख्यमंत्री सुशील कुमार हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी या घटनेवर एक ट्विटशिवाय काय केले, याची माहिती द्यावी, अशी मागणी तेजस्वी यांनी केली. 

‘दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी’
तेजस्वी यादव म्हणाले, की व्हिडिओत आपण पाहिले असेल की, लोकांना शोधून आणि बसवून मारले जात आहे. या घटनेत बिहारच्या दुहेरी इंजिनच्या सरकारची भूमिका काय आहे, हा प्रश्‍नच आहे. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणात याची चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी. तेथील जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना हटविले पाहिजे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहीणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

वाईट ब्रेकअप होऊनही सचिन पिळगावकरांनी निभावलं एक्स गर्लफ्रेंडला दिलेलं वचन !

Karmala News: सावडीत धक्कादायक प्रकार; मानसिक आजारी व्यक्ती १२ वर्षांपासून साखळदंडात, मानवतेला फासला काळिमा..

Pune Crime: राज्यभर गाजलेल्या केडगाव प्रकरणात मोठी कारवाई; आणखी दोन डॉक्टरांवर गुन्हा, एक अटकेत

Dilip Walse Patil: मंचर परिसरात विद्यार्थ्यांसाठी फिनिशिंग स्कूल लवकरच सुरू होणार: दिलीप वळसे पाटील यांची घोषणा, केवळ गुण नव्हे, कौशल्यही महत्त्वाचे

SCROLL FOR NEXT