bihar me nitish ba 
देश

Bihar Election : 'बिहार में फिरसे नितीश कुमार बा'; समर्थकांनी लावले पोस्टर्स

सकाळवृत्तसेवा

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. शेवटपर्यंत अटीतटीचा सामना रंगला. पण सरतेशेवटी नितीश कुमार यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. असं असलं तरीही जेडीयूच्या जागा घटल्या आहेत. त्या 43 वर आल्या आहेत तर भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर तेजस्वी यादवांनी 'तेजस्वी' अशी कामगिरी करत राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून राजदला 75 जागांवर निवडून आणलं. काँग्रेसला 19 जागांवर समाधान मानावं लागलं. 

आणि आता एनडीएने या विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला सुरु केलं आहे. बिहारमधील पाटणामध्ये विजयाचा आनंद करण्यासाठी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर 'बिहार में का बा?' असा  प्रश्न टाकून त्याखाली 'फिर से नितीश कुमार बा!' असं लिहलं आहे. तसेच एका पोस्टरवर No confusion, Great Combination असंही लिहलं आहे. तसेच डबल इंजिन सरकार ने फिर से रचा इतिहास असं लिहून डबल इंजिनही दाखवलं आहे. एका पोस्टरवर नितीश कुमार यांच्या फोटो लावून बिहार ने फिर से चुना 24 कॅरेट गोल्ड असं लिहलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी भाजपने बिहार में इ बा अशा आशयाचे गाणे प्रसिद्ध केले होते. त्याला उत्तर म्हणून राजदने बिहार में का बा? असं विचारणारे गाणे राजदने प्रसिद्ध केले होते. यावरुनच टोला हाणत आता नितीश समर्थकांनी याप्रकारचे पोस्टर्स लावले आहेत. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात झाली. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत बेरोजगारीच्या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. मतमोजणी  पूर्व सर्व अंदाजांनी राजदच्या तेजस्वी यांना स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र, अंतिम क्षणापर्यंत चुरस होऊन सरतेशेवटी एनडीएची डबल इंजिन सरकारला बहुमत  प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC PLAYER OF THE TOURNAMENT LIST: वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या शर्यतीत भारताचा 'एकटा टायगर'! ICC ने जाहीर केली ८ नावं... जाणून घ्या कोण?

Sakal Sanman 2026 : ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत सर्वांची स्वप्ने पूर्ण होतील! ‘सकाळ सन्मान’मध्ये मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास

Iran Warship Attack: इराणच्या दुसऱ्या जहाजाची मदतीसाठी साद; श्रीलंकेकडे प्रवेशासाठी मागितली परवानगी, वाटाघाटी सुरू

MP Dr. Kalyan Kale : युद्धजन्य परिस्थितीत दुबईत अडकलेले जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे मायदेशी परतले

Sangli Shivaneri Bus : सांगली-पुणे मार्गावर धावणार शिवनेरी; राज्यात २०० व्होल्व्हो बस; ‘एसटी’चा ताफा मुंबई-पुणेबाहेर घेणार धाव

SCROLL FOR NEXT