Congress leaders in action mode ahead of Bihar elections, focusing on seat-sharing strategies with opposition parties.

 
sakal
देश

Congress in Action Mode : बिहार निवडणुकीसाठी विरोधकांच्या जागा वाटापाआधीच काँग्रेस 'अ‍ॅक्शन मोड'वर!

Congress strategy for Bihar election : काँग्रेस मुख्यालयात पार पडली प्रदीर्घ बैठक; जाणून घ्या, काँग्रेस नेत्यांनी काय नेमकं काय सांगितलं?

Mayur Ratnaparkhe

Bihar Elections Update News: बिहार विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. महाआघाडीत जागा वाटपाआधी पक्षाने आपल्या निवडणूक तयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने आपल्या स्क्रीनिंग कमेटीची बैठक रविवारी घेतली. सात तास चाललेल्या या बैठकीत जागा निहाय सविस्तर चर्चा झाली. काँग्रेस जवळपास ४० जागांवर उमेदवार निश्चित करण्याच्या जवळपास पोहचली आहे.

काँग्रेस मुख्यालयात रविवारी रात्री पार पडलेल्या या बैठकीत खासदार इमरान प्रतापगढी, प्रभारी सचिव सुशील पासी यांच्याशिवाय प्रदेशाध्यक्ष राजेश राम, शकील अहमद खान आणि मदन मोहन झा यांच्यासह अन्य सदस्य हजर होते. या बैठकीची अध्यक्षता कमिटीचे चेअरमन अजय माकन यांच्याकडे होती.

बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश राम यांचे म्हणणे आहे की, बिहारमध्ये काँग्रेस पार्टी एकाचेवळी अनेक मुद्द्य्यांवर काम करत आहे. पक्ष उमेदवारांच्या घोषणाबाबत कोणतीही घाई नाही. आता सर्व जागा आणि त्या ठिकाणच्या संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा होत आहे. याशिवाय ज्या जागा आम्हाला आधी मिळाल्या होत्या, त्याठिकाणी कशाप्रकारे निवडणूक लढवायची आहे. यावर निवडणूक रणनीती आखली जात आहे. निवडणुकीची तयारी आणि रणनीतींबाबत आम्ही आमच्या सहकारी पक्षांच्या संपर्कात आहोता. महत्त्पूर्ण मुद्दे आणि रणनीती देखील त्यांच्यासोबत चर्चेत घेत आहोत.

या बैठकीत सहभागी सूत्रांचे म्हणणे आहे की, काँग्रेस मागील निवडणुकीतून धडा घेत, यंदा अधिक जागांवर विजय मिळवण्यासाठी योग्य उमेदवारांचा शोध घेत आहे. उमेवदारांच्या निवडीसाठी सर्वे रिर्पोर्ट सोबतच जिल्हा काँग्रेस कमिटीचा रिपोर्ट आणि पर्यवक्षकांच्या रिपोर्टलाही आधार बनवलं जात आहे.

 पक्ष ७० जागांवर उमेदवारांच्या निवडीची तयारी करत आहे. कारण, या त्याच ७० जागा आहेत, ज्या मागील निवडणुकीत पक्षाच्या वाट्याला आल्या होत्या. बिहार काँग्रेस नेते शकील अहमद खान यांचे म्हणणे आहे की, बिहरा निवडणुकीबाबत काँग्रेस पक्षाने तयारी सुरू कली आहे. यंदा आम्ही संपूर्ण मजबुतीसह मैदानात उतरू. रविवारच्या बैठकीत प्लॅनिंग, जागा वाटप आणि सहकारी पक्षांसोबत समन्वय याबाबत चर्चा झाली आहे.

खरं सध्या बिहार निवडणुकीबाबत विरोधी आघाडीत जागा वाटप झालेले नाही. अशावेळी काँग्रेस पार्टी आपल्या कोट्यातील ७० जागांवर डोळा ठेवून आहे. कारण, घटक पक्षांमध्ये जागा बदलण्याची शक्यता कमी आहे. पक्षाशी निगडीत नेत्यांचं म्हणणं आहे की, या निवडणुकीत पक्षाचा प्रयत्न नव्या चेहऱ्यांना संधी देणे आहे. तर काही विद्यमान आमदारांच्याही जागा बदलल्या जाण्याची शक्यता आहे. आधी जिंकलेल्या जागांवर पुन्हा कसा विजय मिळवता येईल, यासाठी देखील रणनीती तयार केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जागा वाटपानंतर लगेचच काँग्रेस आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT