Giriraj Singh esakal
देश

'मी रामाला देव मानत नाही'; मांझींच्या वक्तव्यावर गिरीराज सिंह संतापले

सकाळ डिजिटल टीम

'तुलसीदास आणि वाल्मिकींना मी मानतो. मात्र, राम देव नव्हता, त्यांना मी मानत नाही.'

राम देव नाही, ते केवळ रामायणातील एक पात्र होतं, असं वादग्रस्त विधान बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी केलं होतं. या वादग्रस्त विधानानंतर देशात खळबळ उडालीय. जीतन राम मांझींनी (Jitan Ram Manjhi) प्रभू रामाच्या (Lord Rama) अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना काल्पनिक म्हंटल्याबद्दल गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी मांझींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मांझी यांचं नाव न घेता ते म्हणाले, भारताचा सांस्कृतिक वारसा आणि सनातन धर्म राम, कृष्ण आणि भगवान शिव यांच्याशी निगडीत आहे. लोक रामाला काल्पनिक मानत राहिले. मात्र, न्यायालयानं त्याला मान्यता दिलीय. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळं त्यांनी आपलं मत मांडत रहावं, असा टोमणा त्यांनी मांझींना लगावला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भाषण देताना माझींनी प्रभू श्रीराम यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मांझी म्हणाले, तुलसीदास आणि वाल्मिकींना मी मानतो. मात्र, राम देव नव्हता, त्यांना मी मानत नाही. तसंच रामायण लिहिणारे वाल्मिकी आणि तुलसीदास यांना मी मानतो. मात्र, रामावर माझा विश्वास नाही. यावेळी मांझींनी ब्राह्मणांबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं.

धार्मिक मिरवणुकीवर बंदी घालण्याच्या मांझींच्या मागणीवर गिरीराज म्हणाले, काही लोक मिरवणूक बंद करा, असं म्हणताहेत. ज्यांना बंदी घालायची आहे, त्यांनी खुशाल ती घालावी; पण लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर कोणीही गदा आणू शकत नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आज बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यादरम्यान त्यांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणावरून विरोधकांवरही जोरदार निशाणा साधलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT