bihar vidhansabha

 

sakal

देश

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

JDU Leaders Delhi Visit : भाजप आणि जेडीयूने त्यांच्या आमदारांना पाटणा येथे येण्याचे निर्देश दिले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Latest update on Bihar government formation :बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. जनता दल युनायटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

या बैठकीत अर्थातच मुख्यमंत्रीपद आणि इतर खात्यांच्या वाटपावर या चर्चा होऊ शकते असे मानले जाते. संजय झा आणि राजीव रंजन सिंह यांच्या भेटीनंतर जेपी नड्डा यांनीही अमित शहा यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, राजीव रंजन सिंह आणि संजय झा यांच्यानंतर बिहारचे भाजप प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि सह-प्रभारी विनोद तावडे यांनीही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत निवडणूक निकालांचा आढावा घेण्यात आला आणि सरकार स्थापनेच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली, अशीही माहिती जाते.

विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अद्याप औपचारिकपणे राज्यपालांना राजीनामा सादर केलेला नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतरच सरकार स्थापनेची औपचारिक प्रक्रिया सुरू होईल. तर प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान मोदी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपलब्धतेनुसार अंतिम तारीख निश्चित केली जाईल. त्यापूर्वी पाटण्यात प्रशासकीय हालचाली वाढल्या आहेत. भाजप आणि जेडीयूने त्यांच्या आमदारांना पाटणा येथे येण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : संजू सॅमसन नव्हे, तर ओपनर म्हणून अभिषेक शर्माची जागा घेणार वॉशिंग्टन सुंदर; नामिबियासाठी वेगळा प्लान...

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Viral Video: सूर्यकुमार यादवला नोरा फतेहीचा डान्स पाहताना पत्नींनं रंगेहाथ पकडलं, मग पुढे काय झालं?

Chhagan Bhujbal : कुंभमेळ्यासाठी १३३३ कोटींच्या निधीची मागणी; छगन भुजबळ नाशिकच्या विकासासाठी आक्रमक

Mitchell Marsh Injury: मिचेल मार्शला मांडीजवळ झालेली दुखापत नेमकी आहे काय? जाणून घ्या कारणं, लक्षणं अन् प्रभावी उपाय

SCROLL FOR NEXT