Bihar Murder News Esakal
देश

Bihar Murder News: ऐन निवडणुकीत मोठ्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; समर्थकांनी रोखला रस्ता

Bihar Murder News: पाटण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) चे युवा नेते सौरभ यांची पाटणा येथील पुनपुन येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Bihar Murder News: पाटण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) चे युवा नेते सौरभ यांची पाटणा येथील पुनपुन येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पुनपुन येथील कारपेंटर्स कॉर्नर येथे लग्न समारंभ आटोपून परतत असताना रात्री उशिरा सौरभ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संतप्त समर्थकांनी पाटणा-गया येथे रस्ता रोखून धरला. आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बिहारमधील जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या तरुण नेत्याची बुधवारी रात्री पाटणा येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. रात्री उशिरा सौरभ कुमार आपल्या मित्र आणि कुटुंबासह लग्न समारंभातून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

जखमी व्यक्तीला रुग्णालयात केलं दाखल

एसपी भरत सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "लग्न समारंभातून परत येताच मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी सौरभ कुमार यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डोक्यात आणि मानेला लागली गोळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जीवघेण्या हल्ल्यात जेडीयू नेते सौरभ कुमार यांच्या डोक्यात आणि मानेवर गोळ्या लागल्या आहेत. गोळी लागल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. एसपी भारत सोनी म्हणाले की, ते राजकारण आणि व्यावसायिक संबंधांसह सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

सौरभ कुमार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जनता दल युनायटेडचे ​​संतप्त समर्थक घटनास्थळी जमा झाले. हत्येप्रकरणी प्रशासनाकडून कठोर आणि त्वरित कारवाईची मागणी जेडीयू कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर मारेकऱ्यांना अटक करून तपास पुर्ण करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT