bihar
bihar esakal
देश

बिहार, झारखंडमध्ये पुरस्थिती गंभीर; शेकडो गावांना पाण्याचा वेढा

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : बिहार आणि झारखंडमध्ये पुराची स्थिती गंभीर होत आहे. गंगा नदीने रौद्र रूप धारण केल्याने भागलपूर येथे महापुराने थैमान घातले आहे. ५०० पेक्षा अधिक गावांना पाण्याचा वेढा पडला असून तीनशेहून अधिक शाळा पाण्याखाली गेल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग ८० वर अनेक ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक अद्याप विस्कळित आहे. आज राष्ट्रीय महामार्ग-३१ वर वाहतूक बंद करण्यात आली.

नवगछियाच्या रंगरा विभागात भवानीपूरजवळ एनएच-३१ खालून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग ३१ वर पुन्हा पाणी आले आणि ही ठिकाणी रस्त्याच्या खालचा भाग खचला. त्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग ३१ हा उत्तर, बिहार राज्यातून बंगालकडे जातो.

हा मार्ग बंद केल्याने भागलपूरचा पूर्णिया, कटिहार आदी शहराशी असलेला थेट संपर्क तुटला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग ८० बंद :

पाटण्याहून भागलपूरमार्गे झारखंडच्या साहिबगंजकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग-८० वरील वाहतूक आठवड्याभरापासून बंदच आहे. सुलतानगंजपासून कहलगाव यादरम्यान एक डझनभर ठिकाणी एनएन-८० मार्गावर पाणी आले आहे.

भागलपूरहून पूर्व आणि पश्‍चिमेकडे जाण्यासाठी आज सहाव्या दिवशीही रेल्वे वाहतूक बंद होती. भागलपूर येथे स्थिती चिंताजनक असून नऊ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील शंभरपेक्षा अधिक राज्य महामार्गावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे.

भागलपूरचा ग्रामीण भागही पाण्याखाली :

भागलपूरमध्ये शहराबरोबरच ग्रामीण भागात पाणीपातळी वाढू लागली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिक घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धडपड करत आहेत. शहरातील ५१ पैकी आठ वॉर्डात पाणी आले आहे. पानगर, बाइस बिग्घी, लालूचक, साहेबगंज, किलाघाट, खंजरपूर येथे पाण्याचा प्रवाह असल्याने अनेक घर पाण्याखाली गेले. वॉर्ड २५ मधील गल्ली आणि रस्ते पाण्यात गेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT