bihar journalist raises awareness about masks and compare with donkey video viral 
देश

Video : ...म्हणून पत्रकारानं घेतली गाढवाची मुलाखत

वृत्तसंस्था

पाटना (बिहार): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक असतानाही अनेकजण वापरताना दिसत नाही. मास्कचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आता एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एका पत्रकाराने गाढवाची मुलाखत घेतली आहे. विनामास्क आणि सॅनिटाइझ न करता रस्त्यावर बसलेल्या गाढवाची मुलाखत घेत असताना त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनाही हा पत्रकार प्रश्न विचारत आहे. या मुलाखतीमधून मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याबाबत जनजागृती केली जात असल्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. मास्क न वापरणाऱयांची तुलना गाढवासोबत करून नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम पत्रकाराने केले आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून कौतुक करताना दिसत आहेत.

गाढवाची मुलाखत घेणाऱ्या या पत्रकाराचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाँद नवाबची आठवण होते. मास्क न घालणाऱ्यांची गाढवासोबत तुलना करून एकप्रकारे खिल्ली उडवली असली तरीही मास्क किती अत्यावश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न अनोख्या पद्धतीने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : महिन्याभरात देश अभिमान बाळगू शकेल अशा गोष्टी घडल्या, पंतप्रधान मोदी

Pune FDA: पुण्यात एफडीएची प्रयोगशाळा नसल्याने अडचण; यवत-दौंडमधील गुऱ्हाळांवर कारवाई, अहवाल उशिरा मिळाल्याने ४०० उत्पादकांवर संकट

Amravati: बालपणापासून लैंगिक शोषण, लग्नानंतरही संबंध ठेवत घटस्फोट घ्यायला लावला; महिलेचे महाराजावर गंभीर आरोप

Koyna Dam: कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ! एका रात्रीत १.४२ टीएमसी पाण्याची भर; साठा ५८.८९ टीएमसीवर

FIFA World Cup: २००७ मध्ये अंघोळ घातलेलं ते बाळ अन् आज फायनलनंतरची मिठी... मेस्सी आणि यमालचा त्या Video जिंकली मनं

SCROLL FOR NEXT