Bihar Legislative Council Elections esakal
देश

Bihar| बिहार विधानपरिषद निवडणुकीत एनडीएची बाजी, १३ जागा जिंकल्या

बिहारच्या विधानपरिषदेच्या २४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : बिहारच्या विधानपरिषदेच्या २४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत (Bihar MLC Election Results 2022) राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) पुन्हा एकदा बाजी मारली आहे. निम्म्यापेक्षा अधिक जागा एनडीएने जिंकल्या आहेत. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत २३ जागांचे निकाल घोषित करण्यात आले. यात १३ जागा एनडीएने मिळवल्या. राष्ट्रीय जनता दलने (राजद) पाच जागांवर विजय मिळविला आहे. चार जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. एनडीएत भाजपला (BJP) सात, राष्ट्रीय जनता दलला (संयुक्त) ५ आणि पारस यांच्या रालोसपाने एक जागा जिंकली आहे. (Bihar MLC Election Results NDA Won More Seats)

काँग्रेसनेही एक जागा मिळवली आहे. यंदा जदयूने ११ आणि भाजपने १२ जागांवर आपापले उमेदवार उभे केले होते. राजदने २३ उमेदवारांना मैदानात उतरवले होते. जदयूने मुझफ्फरपूर, नालंदा, भोजपूर, सीतामढी आणि भागलपूर या जागा जिंकल्या आहेत. भाजपने पूर्णिया, गोपालगंज, रोहतास, समस्तीपूर, औरंगाबाद आणि कटिहार येथे विजय मिळविला आहे. पारस यांच्या रालोसपाने हाजीपूरची जागा जिंकली आहे.

राजदने राजधानी पाटणा आणि मुंगेरसह पश्चिम चंपारण, गया आणि सीवान आदी जागा जिंकल्या. काँग्रेसने बेगुसरायची जागा जिंकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri ST Bus Bike Accident : ओव्हरटेकच्या नादात काळाचा घाला! दापोली-मंडणगड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

पॅट कमिन्स कर्णधार असणार की नाही? Ball Tampering Controversy नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला निर्णय

धर्मांतराच्या पहिल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन, बुरख्यातील छायाचित्र, लग्नपत्रिका पुरावा नाही; सत्र न्यायालयाचे निरीक्षण

Latest Marathi News Live Update : वर्सोव्यातील नाना-नानी पार्कमधील वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा एल्गार

Nagpur Accident: जळता ट्रक पाहताना काळाची झडप ;कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू , वेळाहरीजवळ भीषण अपघात

SCROLL FOR NEXT