Nitish Kumar Tejashwi Yadav
Nitish Kumar Tejashwi Yadav  esakal
देश

Bihar Politics : नितीशकुमारांचं सरकार अचानक कोसळलं नाही, तर 'ही' आहेत 4 कारण

सकाळ डिजिटल टीम

सीएम नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात खडाजंगी झाली होती.

Bihar Politics : बिहारमध्ये अखेर राजकीय फेरबदल झालाय. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (NDA) फारकत घेतली आणि राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केलीय. दिल्लीच्या राजकारणात विशेष स्थान असलेल्या बिहारमध्ये हा बदल अचानक झालेला नाहीय. जनता दल युनायटेड (JDU) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्यातील जवळीक काही काळापासून वाढत असल्याचं बोललं जातंय.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर (Bihar Assembly Election) काहीतरी बदल होताना दिसत होता. विधानसभा पाहणाऱ्यांना सीएम नितीशकुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्यात काहीतरी वेगळं चालल्याचं दिसलं. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी विधानसभेत दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. मात्र, नितीश यांनी पुढील वाद टाळण्याचा निर्णय घेतला.

जात जनगणना : गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर जात जनगणनेच्या मागणीवरून नितीशकुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. 10 पक्षांच्या शिष्टमंडळाशिवाय तेजस्वीही त्यांच्यासोबत होते. त्यावेळी राजधानीत दोन्ही नेत्यांमध्ये सामंजस्य दिसून आलं. पत्रकारांशी संवाद साधतानाही ते नितीश यांच्यासोबत राहिले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलण्याची संधीही दिली. मात्र, अनेक पक्षांशी संबंध असल्याने त्याचा राजकीय अर्थ निघू शकला नाही.

इफ्तार पार्टी : यंदाच्या इफ्तार पार्टीत नितीश यांनी तेजस्वींचं जोरदार स्वागत केलं. इतकंच नाही तर आरजेडी नेत्याला गेटपर्यंत सोडायलाही ते पोहोचले. रिपोर्टनुसार, दिल्ली दौरा आणि इफ्तार पार्टी दरम्यान दोन्ही नेत्यांनी 'जातीच्या जनगणनेवर चर्चा' करण्यासाठी आमने-सामने भेट घेतली.

लालूंच्या निवासस्थानावर सीबीआयचा छापा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या निवासस्थानी सीबीआयनं छापा टाकला, तेव्हा जदयूकडून टीकेसारखी प्रतिक्रिया आली नाही. त्याचवेळी लालूंच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या भोला यादव यांच्या अटकेवर पक्षानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अहवालानुसार, नितीश यांनी 2017 मध्ये अशाच प्रकारचे छापे आणि खटल्यांनंतर स्वतःला आरजेडीपासून दूर केलं होतं.

पंतप्रधान मोदींचा पाटणा दौरा : पीएम मोदींनी गेल्या महिन्यात पाटणाला भेट दिली, तेव्हा नितीश यांनी खात्री केली की, तेजस्वीलाही स्टेज शेअर करण्याची संधी मिळेल. विशेष बाब म्हणजे, हे तेच नितीश आहेत ज्यांनी 2017 मध्ये राज्याची राजधानी पाटणा इथं झालेल्या प्रकाशपर्ववेळी राजदच्या नेत्याला विशेष संधी दिली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT