देश

अब्जाधिशांच्या परदेशी मालमत्ता ICIJ कडून उघड; भारतातीयांचाही समावेश

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गर्भश्रीमंत भारतीयांच्या तसेच मातब्बर जागतिक नेत्यांच्या जगभर पसरलेल्या मालमत्ता आयसीआयजे ने उघड केल्या असून, अनिल अंबानी, विनोद अदाणी, जॅकी श्रॉफ, किरण मजूमदार शॉ, निरा राडिया, सचिन तेंडुलकर, सतीश शर्मा आदींचा या यादीत समावेश आहे. अर्थात यापैकी बहुसंख्य मान्यवरांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.

इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) तर्फे या मालमत्ताधारकांची यादी मिळविण्यात आली आहे. विशेषतः जे देश करचुकवेगिरीला आश्रय देतात या देशांमध्ये या मालमत्ता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या यादीत तीनशे भारतीय तसेच अन्य 91 देशांमधील राजकीय नेते व लोकप्रिय व्यक्तींचा समावेश आहे.

ऑक्सफॅम इंडिया ने याप्रकरणी तत्काळ कारवाईची तसेच करचुकवेगिरीला आश्रय देणारे व्यवहार मोडून काढण्याची मागणी केली आहे. या व्यवहारांमुळे जगातील सर्वच देशांचा मिळून दरवर्षी 427 अब्ज अमेरिकी डॉलरचा करमहसूल बुडत असल्याचा अंदाज आहे. याचा फटका अर्थातच गरीब आणि विकसनशील देशांना सर्वात जास्त बसतो. त्यामुळे भ्रष्टाचार आणि गुन्ह्यांनाही प्रोत्साहन मिळते. ही व्यवस्था मोडून काढल्यास सरकारला सामाजिक योजनांसाठी अमूल्य असा निधी मिळेल, असेही ऑक्सफॅमचे म्हणणे आहे.

आपल्या पतीचा परदेशातील ट्रस्ट वैध असल्याचे स्पष्टीकरण बायोकॉनच्या अध्यक्ष श्रीमती किरण मजूमदार शॉ यांनी दिले आहे. त्या वृत्तात आरोप असला तरी कोणीही भारतीय त्या ट्रस्टचा कारभार पहात नाही, असेही त्या म्हणाल्या.

आयसीआयजे ने या अवैध मालमत्तांसंदर्भात चौदा कंपन्यांमधून सव्वा कोटी कागदपत्रे मिळविल्याचा दावा केला आहे. या यादीत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, पॉपस्टार शाकिरा यांचीही नावे असून त्या दोघांनीदेखील या आरोपांचा इन्कार केला आहे. आपली सर्व गुंतवणुक वैध असून ती करवसुली यंत्रणांसमोर यापूर्वीच उघड करण्यात आल्याचे तेंडुलकर च्या वकिलाने सांगितले.

जॉर्डनचे राजे, केनिया, इक्वेडोर व युक्रेनचे अध्यक्ष, झेक रिपब्लिकचे पंतप्रधान तसेच इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचा समावेश आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व रशिया, अमेरिका आणि तुर्कस्तान मधील एकशेतीस अब्जाधिशांच्या व्यवहारांचाही उल्लेख या कागदपत्रांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar : नानाची वाडी झाली सुन्न! सिंहगडाच्या मातीत रमलेला, आणि येथेच विसावला; ग्रामस्थांची भावना

IndiGo Winter Schedule : प्रवाशांना मोठा झटका! बेळगाव-दिल्ली विमानसेवेला 'विंटर' ब्रेक; इंडिगो कंपनीकडून सेवांमध्ये बदल, आता आठवड्यातून तीनच उड्डाणे

Dhruv Rathee Bengaluru Protest : ध्रुव राठी पहिल्यांदाच उतरला रस्त्यावर! बंगळूरमध्ये SIR विरोधात आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, मोदींवरही सडकून टीका

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान- रामदास आठवले

Viral Picture : डेल टेक्नॉलॉजीजच्या संस्थापकाच्या पत्नीला सोशल मीडियावर केले ट्रोल; संपत्ती वाचून डोळे पांढरे होतील..!?

SCROLL FOR NEXT