CBI Probe in Birbhum Violence Case e sakal
देश

Birbhum Violence : ममतांना धक्का! तपास CBI कडे देण्याचे हायकोर्टाचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : पश्चिम बंगालच्या वीरभूम (Birbhum Voilence Case) येथे पेट्रोल बॉम्ब टाकून घर जाळण्यात आलं. यामध्ये ८ जणांना जीवंत जाळून हत्या करण्यात आली. या हिंसाचाराच्या तपासाप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना मोठा धक्का दिला आहे. या घटनेचा तपास केंद्राकडे सोपविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सरकारने वीरभूम हिंसाचाराचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. आतापर्यंत या घटनेचा तपास एसआयटी करत होती. मात्र, आज कोलकाता उच्च न्यायालयाने या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिला आहे.

रामपूरहाट येथे तृणमूल काँग्रेसचा नेता भादू शेख यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर बागतुई येथे पेट्रोल बॉम्ब टाकून घर जाळण्यात आलं. यामध्ये आठ व्यक्तींचा मृत्यू झाला. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला देखील अटक करण्यात आली. तसेच देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. ममतांनी गुरुवारी घटनास्थळी भेट दिली असून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देखील या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. राजकीय स्तरावर अशा घटनांचं समर्थन करणाऱ्यांना जनतेनं माफ करु नये, असं मोदी म्हणाले होते. त्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल यांनीही यावर टिप्पणी करताना पंतप्रधान मोदींनी यावर प्रतिक्रिया दिली तेच आपलं म्हणणं असल्याचं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT