bjp and its govts protecting goon who incited riots in punjab says manish sisodia  
देश

"एका गुंडाला वाचवण्यासाठी..."; मनीष सिसोदिया यांचा भाजपवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (AAP) शनिवारी आरोप केला आहे की, भाजप आणि त्यांची सरकारे पंजाबमध्ये दंगली भडकवणाऱ्या त्यांच्या गुंडास वाचवत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भाजपच्या दिल्ली युनिटचे नेते तजिंदरपाल बग्गा यांना पंजाब पोलिसांनी अलीकडेच त्यांच्या घरातून अटक केली होती, त्यांना पंजाबला जात असताना हरियाणामध्ये थांबवण्यात आले होते आणि काही तासांनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना दिल्लीत परत आणले. या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

भाजपने पंजाब पोलिसांवर आपल्या नेत्याचे अपहरण केल्याचा आरोप केला. बग्गा हे अरविंद केजरीवाल यांचे मोठे टीकाकार आहेत आणि त्यांनी आपचे पक्षप्रमुख केजरीवाल त्यांच्यावर राज्य पोलिसांच्या माध्यमातून सूडाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे.

बग्गा यांना पंजाबमध्ये जातीय तणाव भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, असे म्हणत आपने त्यांचे आरोप फेटाळून लावले. त्याचवेळी बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

या घडामोडीच्या एका दिवसानंतर, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत, 'संपूर्ण भाजप आणि त्यांची सर्व सरकारे पंजाबच्या बंधुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या आणि दंगली भडकवणाऱ्या त्यांच्या एका गुंडाला वाचवण्यात मग्न आहेत.' असा आरोप केला. ते म्हणाले, 'भाजप हा गुंडांचा पक्ष आहे जो सरकारकडूनही गुंडांची कामे करून घेतो. हे लोक कधी चुकूनही शिक्षण, आरोग्य, महागाई, बेरोजगारी यावर बोलत नाहीत.

बग्गा यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती व्यवस्था करणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी शनिवारी सांगितले. भाजप नेत्याने आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हे पाऊल उचलले. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “बग्गा यांनी त्याच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली आहे. आम्ही आवश्यक सुरक्षा व्यवस्था करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs PBKS Live: अर्जुन तेंडुलकरला अखेर पदार्पणाची संधी मिळाली! पंजाब किंग्सच्या तगड्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान

Thane: ठाणे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार! प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांचा मोठा विस्तार होणार; प्रवाशांना मोठा फायदा मिळणार

Marathi Live News update: बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे 2 गटात राडा

कुणाला २० हजार तर कुणाला १ लाख... हास्यजत्राच्या कलाकारांना किती मानधन मिळतं? पृथ्वीक प्रतापने केला खुलासा

Suryakumar Yadav: चाचपडणारा सूर्यकुमार, BCCI ला झालाय नकोसा, पण एका व्यक्तीमुळे अंतिम निर्णय रखडलाय; कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT