BJP Candidate Farmer beat 7 times mla minister in chhattisgarh election results marathi news  eSakal
देश

Ishwar Sahu : दंगलीत मुलगा गमावलेल्या शेतकऱ्याला भाजपने दिलं तिकीट; सात वेळा आमदार राहिलेल्या उमेदवाराला दिला धोबीपछाड!

देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल काल जाहीर झाले - BJP gave ticket to a farmer who lost his son in the riots...

रोहित कणसे

देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल काल जाहीर झाले. यापैकी तीन राज्य राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे भाजप विजय मिळाला आहे. तीन राज्यातील भाजपच्या रणनितीची चर्चा होत आहे. छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्य्यातील साजा येथील विधानसभेच्या जागेवर देखील चुरशीची लढत पाहायला मिळालीय

येथे एका सामान्य कुटुंबातील शेतकरी ईश्वर साहू यांनी सात वेळा आमदार राहिलेले नेते मंत्री रविंद्र चौबे यांना धोबीपछाज देत सर्वाना आश्चर्चाया धक्का दिला आहे.

दुसऱ्या समुदायाच्या जमावाने हिंसाचारादरम्यान ईश्वर साहू यांच्या मुलाची हत्या केली होती. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना होती. याचाच फायदा घेत भाजपने इश्वर साहू यांना तिकीट दिलं होतं. ईश्वर साहू यांना एकूण १०१७८९ मतं मिळाली आहेत त्यांची चौबे यांना ५१९६ मतांनी पराभूत केलं.

छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील सीट साजा येथे एप्रील महिन्यात धार्मिक दंगली झाल्या होत्या. शाळेत झालेल्या हाणामारीपासून सुरू झालेल्या या घटनेने धार्मिक हिंसाचाराचे रुप घेतले होते. या घटनेते दोन्ही बाजूंनी हिंसाचार करण्यात आला. घरे जाळण्यात आली . या हिंसाचारात भुवनेश्वर साहू यांची हत्या करण्यात आली. भाजपने भवनेश्वर साहू य़ांच्या वडील इश्वर साहू यांना निवडणूकीचे तिकीट दिले होते. इश्वर शाहू यांनी मतांच्या बदल्यात आपल्या मुलाला न्याय देणार असल्याचे आश्वासन दिलं होतं.

राजकीय तज्ज्ञांच्या मते ईश्वर साहू यांनी भावनिकतेच्या आधारावर ही निवडणूक लढवली. या जागेवर तब्बल ६० हजार मतदार हे साहू आहेत आणि तेच या जागेवर विजयासाठी निर्णायक ठरत आले आहेत. साहू समाजाचे एकत्रित मते ईश्वर साहू यांना पडावीत यासाठी भाजप प्रयत्नशिल होता. ईश्वर साहू यांना तिकीट देऊन निवडणूकीला धार्मिक रंग देणअयाचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT