Bharti-Pawar-Kids-Vaccination 
देश

लहानग्यांच्या लसीकरणाबाबत भारती पवार यांची महत्त्वाची माहिती

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय मंत्री भारती पवार यांची महत्त्वाची माहिती ऑगस्ट महिन्यात नक्की कधी सुरू होणार लसीकरण? वाचा काय म्हणाल्या... BJP Central Minister Bharti Pawar says Dates for Vaccination for Kids will be announced once trails end vjb 91

विराज भागवत

नवी दिल्ली: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत संशोधकांनी गंभीर इशारा दिला आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर, पुढील महिन्यापासून लहान मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस दिले जातील अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली. याचबाबतीत आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी 'सकाळ-सामटीव्ही'चे विहंग ठाकूर यांच्या संवाद साधत महत्त्वाची माहिती दिली. (BJP Central MoS of Health Bharti Pawar gives important updates related to Dates for Vaccination for Kids)

"लहान मुलांच्या लसींची ट्रायल सुरु आहे. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांवर सध्या चाचणी सुरु आहे. त्याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय जातीने लक्ष ठेऊन आहेत. ट्रायल पूर्ण झाली की या संदर्भातील तारीख कळवण्यात येईल. लसींकरणाच्या बाबतीत तारीख निश्चित सांगणं आता योग्य होणार नाही. ट्रायल पूर्ण झाली की त्यानंतर अधिकृतरित्या तारीख सांगितली जाईल", असे भारती पवार म्हणाल्या.

"ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांकडे मागितली होती. पण राज्यांनी त्यात काही चुका केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सर्व राज्यांकडे यासंदर्भातील यादी मागवण्यात आली आहे. अजून  ऑक्सिजनअभावी मृत्यूंची आकडेवारी  आलेली नाही. ऑक्सिजन अभावी मृत्यूंची आकडेवारी लपवण्याचे काहीच कारण नाही. राज्यांनी आकडेवारी दिली की केंद्र लगेच ही आकडेवारी नक्की जाहीर करेल", असेही भारती पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यामध्ये लहान मुलांना दिली जाणारी कोरोना लस भारतामध्ये येऊ शकते, असं सांगितलं जातंय. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती मंगळवारी झालेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली. या बैठकीत मांडवीय म्हणाले की, सरकार पुढच्या महिन्यात लहान मुलांसाठी कोरोनाची लस देण्यास सुरुवात करेल. भारत लवकरच सर्वांत मोठा लस उत्पादक देश बनेल, कारण अधिकाधिक कंपन्यांना लशीच्या उत्पादनाचे लायसन्सदेखील मिळणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT