BJP expelled MLA Kuldeep Singh Sengar sentenced to life imprisonment for unnao rape case 
देश

अखेर न्याय मिळाला! उन्नाव बलात्कारप्रकरणी कुलदीप सेंगरला जन्मठेप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेला आमदार कुलदीप सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दिल्लीतील तिसहजारी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. उन्नावमध्ये एका युवतीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले हेते. तसेच 25 लाख रूपयांची नुकसान भरपाई सेंगरला पिडितेच्या कुटुंबाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

सेंगर याने पहिले संबंधित मुलीचे अपहरण केले व नंतर तिच्यावर बलात्कार केला. घटना घडली तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. न्यायालयाने 9 ऑगस्टला त्याच्याविरुद्ध गुन्हे निश्‍चित केले होते. अखेर न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

उन्नावमधील ही बलात्काराची घटना 2017मध्ये घडली होती. या प्रकरणाची सुनावणी या वर्षी पाच ऑगस्टपासून दररोज घेण्यात येत होती. मुळात हा खटला लखनौमध्ये दाखल करण्यात आला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला दिल्लीला वर्ग करण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणी झालेल्या सुनावणीत त्याला दोषी ठरवत केंद्रीय अन्वेषण विभागालाही (सीबीआय) दिरंगाई केल्याबद्दल फटकारले होते.

विरोधी पक्षांकडून भाजपवर या प्रकरणी टीका करण्यात आल्यानंतर भाजपमधून त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT