Yogi Adityanath esakal
देश

योगींची मोठी घोषणा, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला मिळणार सरकारी नोकरी

सकाळ डिजिटल टीम

'जनतेनं दिलेला जनादेश हा भाजप नेतृत्वाच्या कार्याला वरदान आहे.'

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना सभागृहाला संबोधित केलं. त्यांनी सरकारच्या मागील कार्यकाळातील कामगिरीचा परिचय करून दिला आणि भविष्यातील कृती आराखडा सांगितला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा केलीय.

योगी आदित्यनाथ म्हणाले, भाजप सरकारमुळं (BJP Government) राज्य दंगलमुक्त झालंय. सरकारनं 86 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीय. शिवाय, धान्य व गहू खरेदीसाठी पारदर्शक यंत्रणाही राबवलीय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शिवपाल सिंह यादव (Shivpal Singh Yadav) यांचं कौतुक करतानाच योगींनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचा काव्यात्मक शैलीत खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, 'नजर नहीं है नजारों की बात करते हैं, जमीं पर चांद-सितारों की बात करते हैं... हाथ जोड़कर बस्ती को लूटने वाले, सभा में सुधारों की बात करते हैं।' असा जोरदार टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री पुढं म्हणाले, आमच्या कामातून जनतेचे आशीर्वाद मिळतात. जनतेनं दिलेला जनादेश हा भाजप नेतृत्वाच्या कार्याला वरदान आहे. आम्ही एक्स्प्रेस वे बनवलाय, एअर कनेक्टिव्हिटी दिलीय. मात्र, यातून आम्हाला कोणतंही श्रेय घ्यायचं नाहीय. सपा सरकारमध्ये (SP Government) रोज घोटाळे होत असतं. मागील सरकारच्या काळात साखर कारखाने (Sugar Factory) कवडीमोल भावानं विकले जात होते. आमच्या सरकारनं नवीन साखर कारखाने उभारले आहेत. आम्ही भारत सरकारला आमच्या साखर कारखान्यांना इथेनॉलशी जोडण्याची विनंती केलीय. आज उत्तर प्रदेश सर्वात मोठं इथेनॉल उत्पादक राज्य बनलंय, असंही त्यांनी नमूद केलं.

प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रोजगाराशी जोडणार

मुख्यमंत्री म्हणाले, 'भाजप सरकार हे तरुणांसाठी जागरूक सरकार आहे. येथील तरुण आपली प्रतिभा दाखवत आहे. आम्ही रोजगार कार्ड देणार आहोत. प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य रोजगाराशी जोडला जाईल. तशी आम्ही अर्थसंकल्पात तरतूद केलीय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT