BJP has no counter to Congress old pension scheme MP Assembly Election news esakal
देश

MP Assembly Election: काँग्रेस भाजपमध्ये काटे कि टक्कर! ओल्ड पेन्शन योजनेला भाजपकडे नाही 'काऊंटर'

नरेश हाळणोर

MP Assembly Election : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत दिसून आली.

भाजपाने महिलांसाठीच्या लाडली बहना योजनेवर भर दिला असला तरी काँग्रेसच्या ओल्ड पेन्शन योजनेला भाजपकडे काहीही 'काऊंटर' नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. (BJP has no counter to Congress old pension scheme MP Assembly Election news)

भाजपाने आपल्या घोषणा पत्रांमध्ये लाडली बहना योजनेला महत्त्वपूर्ण स्थान देतानाच प्रचार सभांमध्ये महिला वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेची राज्यात चर्चा असली तरी काँग्रेसने नारी सन्मान योजना, बीटीया राणी या योजनांतुन पंधराशे आणि अकराशे रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तसेच 500 रुपयात गॅस सिलेंडर देण्याची घोषणा काँग्रेसने केल्याने महिला लाडली बहना या योजनेला किती प्रतिसाद देतात याबाबत मतदार महिलांमध्ये साशंकता आहे.

विशेषतः काँग्रेसने जाहीर केलेल्या ओल्ड पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यात मतपरिवर्तन होण्याची शक्यता जाणकारांसह ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. राज्यातील एकूण मतदारांपैकी मोठा वर्ग ओल्ड पेन्शन योजने पासून दुरावल्याने नाराज आहे.

"भाजप सरकारने ओल्ड पेन्शन योजना सुरू करण्याबाबत स्पष्ट नकार दिला आहे त्यामुळे काँग्रेस जर ओल्ड पेन्शन सुरू करणार असेल तर सरकारी कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो ऑल पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी गरजेची आहे" - शिशिर विश्वकर्मा, भोपाळ

"लाडली बहन योजनेतून महिलांना आर्थिक मदत आणि हक्काचे घर भाजपा देणार आहे यामुळे महिला सक्षमीकरणाला पाठबळ मिळेल भाजप सरकारच्या काळात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे" - आरती, महिला मतदार

"सरकारी नोकरी सगळ्यांनाच मिळत नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन नसेल तर अनेक प्रश्न उभे राहतात. त्यासाठी ओल्ड पेन्शन योजना गरजेची आहे.' - रमाकांत शुक्ला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : पाणी भरण्याच्या वादावरून महिलेने केली शेजाऱ्याची हत्या

SCROLL FOR NEXT