नवी दिल्ली : ‘‘ सर्व विरोधकांची एकजूट कायम राहिल्यास भाजप आणि रा. स्व. संघ (Rss)आपल्याला दडपू शकणार नाही.’’ असे आवाहन करताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा विरोधी पक्षांना ऐक्यासाठी साद घातली. राहुल यांनी ब्रेकफास्ट डिप्लोमसीच्या (Breakfast diplomacy) माध्यमातून अन्य पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे राहुल यांनी बोलाविलेल्या या बैठकीस बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पक्षाचे नेते गैरहजर होते. तृणमूल काँग्रेसच्या (tmc)खासदारांचीही यावेळी म्हणावी तशी उपस्थिती नव्हती. या बैठकीनंतर विरोधी खासदारांनी संसदेपर्यंत सायकल मोर्चा काढून शक्तिप्रदर्शनही केले. ( BJP is not in danger)
राहुल यांनी आज संसदेपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये न्याहरीनिमित्त विरोधकांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला सोळा ते सतरा पक्षांचे नेते यात उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात होते परंतु, आम आदमी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने या निमंत्रणाकडे सरळसरळ पाठ फिरवली.
या बैठकीला द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मुस्लिम लीग, आरएसपी, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स आणि लोकतांत्रिक जनता दलाचे नेते प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी, के.सी वेणुगोपाल, जयराम रमेश, तृणमूलचे नेते कल्याण बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव, शिवसेना नेते संजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.