nitin gadkari esakal
देश

Nitin Gadkari: 'घोटाळा नाही, नफाच झालाय'; CAG रिपोर्टवरुन नितीन गडकरींची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

Nitin Gadkari rejects auditor CAG fund mismanagement charge

नवी दिल्ली- द्वारका एक्स्प्रेसवेवर कॅगच्या रिपोर्टवरुन केंद्र सरकारविरोधात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. कॅग रिपोर्टवर बोलताना गडकरी म्हणाले की, द्वारका एस्क्प्रेसवेसंबंधी घोटाळ्याच्या बातम्या खोट्या आहेत. उलट द्वारका एक्स्प्रेसवेवर १२ टक्के पैसे वाचवण्यात आले आहेत.

१० ऑगस्ट रोजी संसदेत कॅगचा रिपोर्ट सादर करण्यात आला होता. यामध्ये द्वारका एक्स्प्रेसवेच्या निर्माण कार्यात अधिकचे पैसे खर्च करण्यात आल्याचं म्हटलं होतं. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांना चांगला मुद्दा मिळाला आहे. नितीन गडकरी यांनी 'आज तक' या चॅनेलशी बोलत असताना आरोपाचे खंडन केले.

रिपोर्टमध्ये सांगितलेले मुद्दे योग्य नाहीत. द्वारका एस्क्प्रेसवे २९ किलोमीटर अंतराचा असल्याचं सांगण्यात आलंय. आम्ही जो कॅबिनेट नोट पाठवली होती त्यात लिहिलं होतं की आम्ही पाच हजार किलोमीटरचा टू लेन रोड बनवू आणि त्याची किंमत ९१ हजार कोटी रुपये असेल. यात फ्लायओव्हर आणि रिंगरोडची किंमत इस्टिमेटेड डीपीआर बनल्यानंतर ठरवण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

मुद्दा असा आहे की कॅग ज्याला २९ किलोमीटर म्हणत आहे, तो २३० किलोमीटरचा एस्क्प्रेसवे आहे. यात ६ टनेल आणि ५६३ किमी एकूण लेनचा रोड आहे. जो टेंडर निघाला होता तो २०६ कोटी रुपये प्रति किलोमीटर साठी होता. त्यामुळे आम्ही या प्रोजेक्टवर १२ टक्के कमी खर्च केला आहे.

गडकरी म्हणाले की, आमच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्दा कॅगसमोर ठेवला होता. चर्चेमध्ये कॅग अधिकाऱ्यांनी ही गोष्ट मान्य केली होती. पण, आमच्याकडून चूक झाली की आम्ही ही गोष्ट त्यांना लिखितमध्ये दिली नाही.

मीडियासह विरोधकांना सांगू इच्छितो. आम्ही टाईम बाऊंड आहोत, रिझल्ट ओरिएंटेड आहोत आणि भ्रष्टाचार मूक्त आहोत. या सरकारमध्ये मी ५० लाख कोटींचे कामं केली आहेत. एकाही कामामध्ये कोणताही कत्रांटदार किंवा अन्य कोणी म्हणत असेल की एक रुपयाही द्यावा लागला असेल तर मी म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT