Pragya Thakur On Rahul Gandhi esakal
देश

Pragya Thakur : 'तुमची आई इटलीची, परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीच देशभक्त होऊ शकत नाही'

देशाच्या संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. विरोधी पक्ष दडपले जात आहेत. आमचे फोन टॅप केले जात आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला होता.

सकाळ डिजिटल टीम

परदेशात बसून आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही, असं म्हणता यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट नाही. त्यांना या देशातून हाकललं पाहिजे.

Pragya Thakur On Rahul Gandhi : राहुल गांधींनी युनायटेड किंगडममधील ऑक्सफर्ड विद्यापीठात (Oxford University) ज्या पद्धतीनं भाषण केलं, त्यानंतर ते सतत चर्चेत आहेत.

देशाच्या संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. विरोधी पक्ष दडपले जात आहेत. आमचे फोन टॅप केले जात आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. इतकंच नाही तर राहुल गांधींनी फोनमध्ये पेगासस टाकल्याचं म्हटलं होतं.

देशातील लोकशाहीबाबत राहुल गांधींनी विद्यमान सरकारवर निशाणा साधत मोदी सरकारनं (Modi Government) भारतातील सर्व संस्था आपल्या ताब्यात घेतल्याचं म्हटलं होतं. राहुल गांधींच्या या भाषणावर आता भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी जोरदार हल्लाबोल केला.

प्रज्ञा ठाकूर (Pragya Thakur) म्हणाल्या, 'संसदेत कामकाज चांगलं चाललं आहे. सर्व काही ठीक आहे, पण काँग्रेसचे लोक सरकार चालवू देत नाहीत, संसद चालू देत नाहीत. संसद चालली तर आणखी कामं होतील, जास्त कामे झाली तर आपलं अस्तित्व अजिबात टिकणार नाही, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळं त्यांचं अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे. पण, आता त्यांची बुद्धिमत्ताही भ्रष्ट होत चालली आहे. साधं आहे, तुम्ही देशाचे नेते आहात. तुम्हाला जनतेनं निवडून दिलंय. तुम्ही जनतेचा अपमान करत आहात, देशाचा अपमान करत आहात.'

ठाकूर पुढं म्हणाल्या, 'तुम्ही भारताचे नाही. तुमची आई इटलीची आहे, हे आम्ही मान्य केलंय. परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही. इतकी वर्षे काँग्रेसचं सरकार (Congress Government) होतं, तुम्ही देश पोकरला. परदेशात बसून आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही, असं म्हणता यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट नाही. त्यांना या देशातून हाकललं पाहिजे, अशी टीका त्यांनी राहुल यांच्यावर केलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

C.P. Radhakrishnan Vice President of India : सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन १७वे उपराष्ट्रपती

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

SCROLL FOR NEXT