Suvendu Adhikari News esakal
देश

Suvendu Adhikari : 'त्यांनी हिंदूंना मारलं, मंदिरं उद्ध्वस्त केली आता मुघलांची नावं-चिन्हं उखडून फेकून द्या'

प्रसिद्ध मुघल गार्डनचं (Mughal Garden) नाव बदलून 'अमृत उद्यान' (Amrit Udyan) असं करण्यात आलंय.

सकाळ डिजिटल टीम

मुघल गार्डन आता अमृत उद्यान म्हणून ओळखलं जाणार आहे. राष्ट्रपती भवनातील सुमारे 106 वर्षे जुन्या मुघल गार्डनचं नामकरण करण्यात आलं आहे.

Suvendu Adhikari News : प्रसिद्ध मुघल गार्डनचं (Mughal Garden) नाव बदलून 'अमृत उद्यान' (Amrit Udyan) असं करण्यात आलंय. मुघल गार्डनचं नाव बदलण्याच्या निर्णयाचं भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांनी स्वागत केलं असून ते ऐतिहासिक असल्याचं म्हटलंय.

त्याचवेळी पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंद्र अधिकारी म्हणाले, 'मुघलांची नावं आणि चिन्हं उखडून फेकून द्या.' एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अधिकारी म्हणाले, 'त्यांनी अनेक हिंदूंना मारलं, अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. केवळ मुघल गार्डनच नाही तर संपूर्ण देशातून त्यांचं नाव हटवलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

भाजप नेते पुढं म्हणाले, 'बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यास आठवडाभरात इंग्रज आणि मुघलांची नावं काढून टाकू. मुघल गार्डनचं नाव बदलल्यामुळं भारत गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येत असल्याचं दिसून येतंय, असंही ते म्हणाले. त्रिपुरा निवडणुकीबाबत बोलताना अधिकारी म्हणाले, त्रिपुरामध्ये टीएमसीची स्थिती गोव्यापेक्षा वाईट असेल. तिथं जे TMC उमेदवार असतील, त्यांचं डिपॉझिट जप्त केलं जाईल. इथं लढत फक्त भाजप आणि सीपीएम-काँग्रेस आघाडीमध्येच होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुघल गार्डन आता अमृत उद्यान म्हणून ओळखलं जाणार आहे. राष्ट्रपती भवनातील सुमारे 106 वर्षे जुन्या मुघल गार्डनचं नामकरण करण्यात आलं आहे. हे उद्यान आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे, हे पाहण्यासाठी दरवर्षी हजारो लोक राष्ट्रपती भवनात पोहोचतात.

आज म्हणजेच रविवार, 29 जानेवारी रोजी राष्ट्रपती अमृत उद्यानाचं उद्घाटन करतील. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर 31 जानेवारी ते 30 मार्च या कालावधीत अमृत उद्यान सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे. लोकांना ते दोन महिने पाहता येणार आहे. राष्ट्रपती भवनानं जारी केलेल्या निवेदनात सांगितलंय की, उद्यान साधारणपणे महिनाभर सुरू होतं, परंतु यावेळी त्याची वेळ वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT