Karnataka State President esakal
देश

Karnataka Politics : दारुण झालेल्या पराभवानंतर भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; 'या' बड्या नेत्यांची नावं चर्चेत

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील लवकरच राजीनामा देण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांचा कार्यकाळ संपला असून ते लवकरच राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election) लक्षात घेऊन भाजपने (BJP) अनेक नेत्यांच्या पदांमध्ये बदल केले आहेत. राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त झालेले सी. टी. रवी यांना यावेळी वगळण्यात आले आहे. पण, प्रदेश भाजप अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता बळावली आहे.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी भाजप नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची वर्णी लागण्याचीही शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) आणि राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी शुक्रवारी रात्री नवी दिल्लीत कर्नाटकच्या विकासावर चर्चा केली.

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांचा कार्यकाळ संपला असून ते लवकरच राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सी. टी. रवी या पदासाठी अनुकूल आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असून यावेळी हिंदुत्व आणि संघ परिवाराशी एकनिष्ठ असलेल्यांना संधी मिळावी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नेत्यांनी मागणी केली आहे.

चिक्कमंगळूर येथील बाबा बुडनगिरीच्या वादातून राजकारणात आलेले सी. टी. रवी हे कट्टर हिंदुत्ववादी आणि उत्तम वक्ते आहेत. ते चिक्कमंगळूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा विजयी झाले होते. पण, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विश्‍वासातील थम्मय्या यांनी त्यांचा ऐतिहासिक पराभव केला.

राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून गोवा आणि महाराष्ट्राचे प्रभारी असूनही अनंतकुमार यांच्यासारखा करिष्मा मात्र त्यांना करता आला नाही. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर भाजपला विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता आजही निवडता आला नाही.

रवी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. वक्कलिग समाजाला प्रदेशाध्यक्षपद दिल्यास लिंगायत समाजातील बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे.

या पदासाठी माजी मंत्री व्ही. सुनीलकुमार, अरगा ज्ञानेंद्र, आर. अशोक यांची नावेही आघाडीवर आहेत. तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, सुशील नमोशी, वाय. ए. नारायण स्वामी, तेजस्विनी रमेश गौडा आदींची नावे आघाडीवर आहेत.

पुढील आठवड्यात नेत्यांची निवड

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष, विधानसभेच्या दोन्ही सभागृहातील नेते आणि उपनेते, मुख्य प्रतोद आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT