BJP MLA T Raja Singh esakal
देश

पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; आमदार टी. राजा सिंह यांना भाजपनं केलं निलंबित

तेलंगणा (Telangana) राज्यातील भाजप आमदार टी. राजा सिंह (BJP MLA T Raja Singh) यांना अटक झालीय.

सकाळ डिजिटल टीम

तेलंगणा (Telangana) राज्यातील भाजप आमदार टी. राजा सिंह (BJP MLA T Raja Singh) यांना अटक झालीय.

तेलंगणा (Telangana) राज्यातील भाजप आमदार टी. राजा सिंह (BJP MLA T Raja Singh) यांना अटक झालीय. प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्याबद्दल अनुचित उद्गार काढून धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. टी राजा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळत होता.

हैदराबाद (Hyderabad) इथं लोक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) आज (मंगळवार, 23 ऑगस्ट) सकाळी टी. राजा यांना अटक केली. त्यानंतर आता भाजपनं देखील कारवाई केलीय. टी राजा सिंह यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावर भाजपनं कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर मागितलंय. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कथित वक्तव्य केल्यानंतर टी राजा यांच्या विरोधात काही ठिकाणी तक्रारी दाखल झाली होती. प्राप्त तक्रारींवरुन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले होते. दबीरपुरा भवानी नगर, रेनबाजार, मीराचौक पोलीस स्टेशन आदी ठिकाणी नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. टी राजा यांच्या वक्तव्यानंतर आपल्या भावना तीव्र स्वरुपात व्यक्त करत अनेक नागरिकांनी म्हटलं की, त्यांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत. दरम्यान, टी. राजा यांनी नुकताच आपला एक व्हिडिओ अपलोड केला होता. यात त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलीस कमिशनर सीव्ही आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील इतरही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरु झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT