BJP MP Ramesh Bidhuri asked Rahul Gandhi for Corona Test after returning from Italy 
देश

'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का?'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली  : भारताच्या शेजारील देशात चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अशातच चीन, इटली, मलेशिया, इराण, जपान, सौदी अरेबिया या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांचीही कसून तपासणी होत आहे. या पर्यटकांना कोरोनाच्या सर्व चाचण्या करूनच विमानतळावरून प्रवेश दिला जात आहे. अशातच काँग्रेस खासदार राहुल गांधीही सहा दिवसांपूर्वीच इटलीहून परतले आहेत. त्यांनीही कोरोनाची चाचणी केली का असा सवाल भाजपच्या खासदाराने केला आहे. 

सहा दिवसांपूर्वीच राहुल गांधी इटलीहून पुन्हा भारतात आले. त्यांनी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला. पण राहुल यांनी परतल्यानंतर कोरोनाची चाचणी केली आहे का? त्यांनी भारतात आल्या आल्या चाचणी करायला हवी होती, असे भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी राहुल गांधीवर निशाणा साधत म्हणले. इटलीतही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. तिथे आतापर्यंत १०० नागरिक कोरोनाने दगावले आहेत. त्यामुळे इटलीहून परत आल्यानंतर राहुल यांनी चाचणी केली का, असा सवाल बिधुरी यांनी केला. 

कोरोना व्हायरस संसर्गजन्य आहे. राहुलजी नुकतेच इटलीहून परतले आहेत. त्यांनी कोरोनाची चाचणी केली की नाही मला माहीत नाही. तसेच राहुल यांनी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात जाऊन लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी बातचीत केली. मात्र लोकांमध्ये मिसळण्यापूर्वी त्यांनी कोरोनाची चाचणी केली की नाही हे स्पष्ट करायला हवे असे बिधुरी यांनी संसदेत माध्यमांशी बोलताना सांगितले.

चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३ हजारहून जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. भारतातही कोरोनाचे ३० संशयित आहेत. यातील १६ जण इटलीहून आले आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: महापालिकेसाठी शिंदे गट सक्रिय, लोकसभा मतदारसंघनिहाय नेत्यांवर जबाबदारी

Kolhapur Youth Clash : स्टेटस्‌वरून खुन्नस, दबा देंगे हर आवाज, जो उंची होगी...; महागडे कपडे, विनानंबर प्लेट दुचाकी..., कोल्हापूर पोलिसांची काय भूमिका?

सॉरी, आम्ही जग सोडतोय! चिठ्ठी लिहून महिलेनं ११ वर्षीय मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी; पती घरातच झोपलेला

Asia Women Hockey: भारत-चीनमध्ये अंतिम फेरीची लढत; आशिया करंडक महिला हॉकी, आज सामना

Nitesh Karale: नितेश कराळे मास्तरांना पवारांच्या भेटीला पोलिस सोडेना, मास्तरांकडून फोनाफोनी सुरू

SCROLL FOR NEXT