Subramanian Swamy vs AmitShah esakal
देश

पंडितांच्या हत्येवर सुब्रमण्यम स्वामी म्हणतात, 'अमित शहांनी क्रीडामंत्री व्हावं'

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमध्ये पंडितांना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे. गेल्या 3 दिवसांत 3 हिंदूंना ठार मारण्यात आलंय.

Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये पंडितांना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे. गेल्या 3 दिवसांत 3 हिंदूंना ठार मारण्यात आलंय. या हत्येनंतर भाजप नेतेही आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच निशाणा साधलाय. अमित शहांना (Amit Shah) गृह मंत्रालयाऐवजी क्रीडा मंत्रालयात पाठवावं, असं त्यांनी म्हटलंय.

काश्मीरमध्ये रोज काश्मिरी पंडितांना ठार मारलं जातंय, त्यामुळं आता अमित शहांनी राजीनामा देणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. स्वामी यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. मात्र, तरीही दररोज एका काश्मिरी हिंदूची (Kashmiri Pandit) गोळ्या झाडून हत्या केली जात आहे. त्यामुळं अमित शहांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. गृह मंत्रालयाऐवजी त्यांना क्रीडा मंत्रालय दिलं जावं. कारण, आजकाल क्रिकेटमध्ये त्यांना जास्त रस पहायला मिळत आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय.

काश्मीरमध्ये गेल्या 20 दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. यात काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित हिंदूंचा समावेश आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात टार्गेट किलिंगच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरी आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलंय. या हल्ल्यांबाबत मोदी सरकार आधीच विरोधकांच्या निशाण्यावर आहे. आता सरकारचेच लोक गृहमंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारू लागले आहेत.

याआधीही स्वामींनी मोदी सरकारवर अनेकदा टीका केलीय. भाजप खासदारानं अफगाणिस्तानपासून चीनपर्यंतच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरलंय. इतकंच नाही तर स्वामी अर्थमंत्री आणि सरकारवर आर्थिक धोरणांवरुन टीका करताना दिसत आहेत. या टीकेबाबत काही वेळा भाजपच्या काही नेत्यांशी त्यांचे वादही झाले आहेत. मात्र, स्वामींच्या या टीकेवर भाजप हायकमांडकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT