BJP nupur sharma in trouble mumbai police will issue summon prophet muhammad  
देश

नुपूर शर्मांच्या अडचणीत वाढ, आता मुंबई पोलिस बजावणार चौकशीसाठी समन्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एका टीव्‍ही चर्चेदरम्यानच्‍या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबक अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. या वक्तव्यावरून त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मुंबई पोलीस लवकरच त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावणार आहेत.

मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी ही माहिती दिली आहे. पांडे म्हणाले की, मुंबई पोलीस लवकरच भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना बोलावून घेतील आणि ज्ञानवापी विषयावरील टीव्ही चर्चेदरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचे म्हणणे नोंदवले जाईल. याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.

या प्रकरणीही कार्यवाही सुरू असल्याचे संजय पांडे यांनी सांगितले. एफआयआर नोंदवल्यानंतर जी प्रक्रिया असेल, ती पाळली जाईल. नुपूर शर्माने एका टीव्ही चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली होते आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

रझा अकादमीचे सहसचिव इरफान शेख यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, नुपूर शर्मा विरुद्ध २९ मेच्या रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. नुपूर शर्मा विरुद्ध आयपीसी कलम 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अंतर्गत त्याच्यावर धार्मिक शत्रुत्व भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय दोन गटांमधील शत्रुत्व वाढवल्याच्या आरोपावरून कलम 153A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे भाजपला बॅकफूटवर यावे लागले आहे. एकीकडे कतार, सौदी अरेबिया, कुवेत, यूएई, बहरीनसह अनेक इस्लामिक देशांनी यावर भारतीय राजदूतांकडे याबद्दल तक्रार केली, तर दुसरीकडे भारतावरही जोरदार टीका होत आहे. इतकेच नाही तर शुक्रवारी कानपूरमध्ये हिंसाचाराचे कारणही हेच होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कानपूरमध्ये असताना हा हिंसाचार झाला. विशेष म्हणजे, चौफेर हल्ल्यानंतर भाजपने रविवारी नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. त्यांच्याशिवाय या मुद्द्यावर ट्विट करणारे आणखी एक सदस्य नवीन जिंदाल यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT