देश

गृहमंत्रालयाने मागविला खुलासा प. बंगाल सरकारच्या अडचणी वाढल्या 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर काल (ता. १०) झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेबाबत राज्यपाल जगदीप धनकर यांनी रातोरात पाठविलेला अहवाल मिळताच केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवून राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांना येत्या १४ डिसेंबरला दिल्लीत हजर राहून खुलासा करण्याचे फर्मान काढले आहे. त्यांच्याकडून झाल्या प्रकाराबद्दल समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास केंद्राने पश्‍चिम बंगाल सरकारविरुद्ध कठोर कारवाईची तयारी केल्याचे मानले जाते. 

सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने मोदी सरकार ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करण्याचा मार्ग चोखाळण्याची शक्‍यता नाही. मात्र यातून राजकीय परिस्थिती आणखी अनुकूल करण्यासाठी आवश्‍यक ती कारवाई केंद्राकडून होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांवर कारवाईचे अधिकार केंद्राकडेही असतात असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. या स्थितीत ममता सरकार या दोन्ही सर्वोच्च अधिकाऱ्यांना मुळात दिल्लीला पाठवेल काय, याबद्दलही तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

...तर अनर्थ झाला असता 
बंगालच्या दौऱ्यावर असलेले नड्डा यांच्या ताफ्यावर काल काही जणांनी जोरदार दगडफेक केली. भाजपने याबद्दल थेट तृणमूल कॉंग्रेसवर आरोप केला आहे. या घटनेत कैलास विजयवर्गीय यांचा हात फ्रॅक्‍चर झाला आहे. आपली गाडी बुलेटप्रूफ नसती तर दोनशेहून जास्त गुंडांनी केलेल्या दगडफेकीत काही वेगळेच घडले असते अशी शंका नड्डा यांनी बोलून दाखविली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमित शहा मैदानात 
नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा राज्यातील प्रचाराची सूत्रे स्वतःकडे घेतली आहेत. ते  येत्या १९ व २० डिसेंबरला पुन्हा बंगालचा दौरा करतील. यादरम्यान शहा भाजप नेते-कार्यकर्त्यांना भेटतील. पत्रकार परिषद घेतील बुद्धीवंतांच्या  बैठकीलाही संबोधित करतील. गेल्या महिनाभरात शहा दुसऱ्यांदा बंगालच्या दौऱ्यावर जात असून ते व नड्डा महिन्यात किमान एक-दोनदा तरी बंगालचा दौरा करतील असे नियोजन भाजपच्या नेतृत्वाने केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT