BJP president JP Nadda criticizes Congress esakal
देश

'जे 40 वर्षे एकत्र होते तेही पक्ष सोडताहेत, काँग्रेस आता भावा-बहिणीचा पक्ष झालाय'

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर पुन्हा ताशेरे ओढले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर पुन्हा ताशेरे ओढले आहेत.

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेस पक्षाचा (Congress) राजीनामा दिल्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलेत. काँग्रेस हा घराणेशाहीला चालना देणारा पक्ष बनलाय, असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेस आता फक्त भावा-बहिणीचा पक्ष राहिला आहे, अशी टीकाही त्यांनी गांधी घराण्यावर केली.

जम्मू-काश्‍मीरातील (Jammu and Kashmir) काँग्रेसमधील कलह चव्हाट्यावर आल्यानंतर आणि ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर आता पक्ष पुन्हा एकदा भाजपच्या निशाण्यावर आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, 'काँग्रेस आता फक्त भावा-बहिणीचा पक्ष झाला आहे. जे 20-40 वर्षे काँग्रेससोबत होते, त्यांनी पक्ष सोडला. कारण, ते आता राष्ट्रीय किंवा प्रादेशिक नाहीयत. आता पक्ष फक्त भावा-बहिणीच्या घराणेशाहीचा पक्ष आहे.'

नड्डा पुढं म्हणाले, काँग्रेस हा सर्वात जुना राजकीय पक्ष आता कमकुवत झाला आहे, याचं कारण काँग्रेसनं राष्ट्रीय एकात्मतेसह स्थानिक आकांक्षा लक्षात घेतल्या नाहीत. दुसरीकडं भाजप स्थिरतेकडं वाटचाल करत आहे, असंही त्यांनी नमूद केलं. सोमवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आसाममध्ये पोहोचले होते. जिथं त्यांनी गुवाहाटी येथील कामाख्या देवी मंदिरात पूजा केली. कामाख्या मातेच्या दर्शनाचं सौभाग्य मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Gokul Election : सतेज पाटलांनी ताकद दाखवली, एकट्याने १८५१ ठराव केले दाखल; 'लवकरच बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार'

ICC चं वेळापत्रक ठरलं वादाचं कारण! एका प्रश्नानंतर माजी क्रिकेटपटूंना जीवे मारण्याच्या धमक्या; महिला टी-20 विश्वचषकात मोठा वाद

Latest Marathi News Live Update : राज्यात 5 दिवस अतिमुसळधार पाऊस; कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट

Viral Rescue video: भर पावसात रात्र काढली जंगलात; अतिउत्साह नडला; गोव्यातील सहा युवकांची अखेर सुटका, व्हिडिओ व्हायरल..

लग्नाला १४ वर्ष झाली, पण पाळणा हलला नाही; पत्नीला राग अनावर, संतापात पतीच्या गुप्तांगावर उकळतं पाणी ओतलं अन्...

SCROLL FOR NEXT