bjp.jpg
bjp.jpg 
देश

भाजपच खरी 'तुकडे तुकडे गँग', एनडीएच्या जुन्या सहकारी पक्षाचा गंभीर आरोप

सकाळ ऑनलाईन टीम

चंदीगड-  सुधारित कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या 21 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनामुळे सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारवर तुटून पडले आहेत. कृषी कायद्यावरुन पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाने एनडीएशी असलेली आपली जुनी मैत्री तोडली. याचदरम्यान आता शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच खरी 'तुकडे तुकडे गँग' असल्याचा आरोप त्यांनी त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, भाजपने कृषीसंबंधी कायद्यांवर आपला अहंकार सोडून शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी हिंदूंना शीखविरोधात उभा करु नये, असा इशाराही दिला आहे. 

जर कोणी केंद्र सरकारच्या बाजूने बोललं तर तो देशभक्त समजला जातो. जर कोणी त्यांच्याविरोधात बोललं तर त्याला 'तुकडे तुकडे गँग' म्हटले जाते. खरं तर देशात भाजपच तुकडे तुकडे गँग आहे. त्यांनी देशाची एकता तुकड्यातुकड्यामध्ये विभागली आहे. निर्लज्जपणे हिंदूंना मुसलमानांविरोधात चिथावणी दिली जात आहे आणि आता शांतताप्रिय पंजाबी हिंदूंना त्यांच्या शीख बांधवांविरोधात भडकवले जात आहे. ते देशभक्त पंजाबींना जातीयवादात ढकलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

अकाली दलाने संसदेत संमत झालेल्या कृषी विधेयकाच्या विरोदात केंद्रातील एनडीएशी संबंध तोडले होते. सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांन केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT