priyanka gandhi narendra modi Esakal
देश

PM Modi: राजकारणाची पातळी आणखी किती खाली आणणार आहात?' 'रावण' पोस्टवरुन प्रियांका गांधी मोदींवर भडकल्या

Priyanka Gandhi lashed out at Modi over 'Raavan' post.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये वाद-प्रतिवादांना धार आली आहे. भाजपने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. यात राहुल यांना रावणाच्या रुपात दाखवण्यात आलं होतं. याच मुद्द्यावरुन काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना राजकारणातील वादविवादाची पातळी आणखी किती खाली आणायची आहे? तुमच्या पक्षाच्या अधिकृत ट्विटर (एक्स) अकाऊंटवरुन जे हिंसक आणि भडकाऊ ट्वीट केले जात आहेत, याला तुमचे समर्थन आहे का?, असा थेट सवाल प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

भाजपने आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवरुन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी हे नव्या युगाचे रावण आहेत. ते दुष्ट आहेत, धर्माला विरोध करणारे आहेत. भगवान रामाला विरोध करणारे आहेत. त्यांचा उद्देश भारताचा नाश करण्याचा आहे, असं म्हणत भाजपने राहुल यांची यांच्या रावणाच्या अवतारातील फोटो शेअर केला होता.

भाजपकडून राहुल गांधींना सात तोंडाचा रावण म्हणून दाखवण्यात आलं होतं. यानंतर भाजपवर काँग्रेसने टीका केली आहे. प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांना त्यांच्या शपथेची आठवण करुन दिली आहे. जास्त वेळ झालेला नाही, तुम्ही पवित्रता राखण्याची शपथ घेतली होती. आश्वासनासारखं तुम्ही शपथपण विसरली का? असं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. तसेच लोकसभा निवडणुकाही पुढील वर्षी होणार आहेत. यापार्श्वभूमीवर भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT