keshav upadhye and sanjay raut
keshav upadhye and sanjay raut 
देश

भाजपचे केशव उपाध्ये संजय राऊतांच्या भेटीला, निवडणुकीआधी घडामोडींना वेग

सकाळ डिजिटल टीम

भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची गोव्यात भेट घेतली. गोव्यात येत्या १४ फेब्रुवारीला मतदान पार पडत आहे. त्यामुळे प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी सहानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने विविध पक्षांचे दिग्गज याठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. (BJP spokesperson Keshav Upadhye Meets Sanjau Raut in Goa) दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीने पत्रकार परीषद घेतली. पण त्याआधी भाजपचे केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांची भेट घेतली.

गोवा निवडणूक प्रचार शेवटच्या दिवशी केशव उपाध्ये संजय राऊत यांच्या भेटीला त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. (Goa Assembly Elections 2022) दोन महिन्यांनी मुंबईच्या महानगरपालिका निवडणुका लागणार आहेत. यंदा शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. (BMC Elections 2022)

या भेटीनंतर काही वेळातच आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परीषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. मात्र, मतदारसंघात येऊ नका, असे काही जणांचे फोन आल्याचं म्हटलं. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुंबईतील मोठे नेते आणि त्यांच्यासोबतच यंदा नारायण राणे देखील भाजपच्या बाजूने सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र त्याआधी प्रचारादरम्यान गोव्यात राऊत आणि उपाध्ये हे दोन्ही भेटले आहेत. संजय राऊत वास्तव्यास असलेल्या हॉटेलवर केशव उपाध्ये दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT