BJP suspends Nupur Sharma and Naveen Jindal from party s primary membership  
देश

भाजपची मोठी कारवाई! नुपूर शर्मा, नवीन जिंदाल निलंबित

रोहित कणसे

भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या दोघांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल काढलेल्या अनुद्गार प्रकरणी भाजपने मोठी कारवाई केली आहे. कोणत्याही धर्माचा किंवा धार्मिक व्यक्तीचा अपमान भाजप निंदनीय मानतो, अशा शब्दांत भाजपने शर्मा यांची पाठराखण करण्याचे साफ टाळले होते. त्यानंतर ही कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान नविन जिंदाल हे भाजपचे मीडिया प्रभारी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनाही ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. एका टिव्ही शो मध्ये बोलत असताना भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यानंतर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

भाजप राष्ट्रीय मुख्यालयाच्या प्रमुख अरुण सिंह यांनी आज याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करणारे निवेदन दिले होतो. यामध्ये शर्मा यांच्याबाबतच्या वादापासून पक्षाने हात झटकत भाजप धार्मिक एकतेवर विश्वास ठेवतो. कोणत्याही धर्मातील पूजनीय व्यक्तींचा अपमान भाजपला मान्य नाही असे म्हटले आहे. तसेच कोणत्याही धर्म किंवा संप्रदायाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये-विचार भाजपला मान्य नाहीत. असे विचार निंदनीय आहेत. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म या मातीत रूजला व वाढला आहे. भाजप प्रत्येक धर्माचा सन्मान करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT