BJP TMC Supporters Fight Esakal
देश

BJP TMC Supporters Fight: भाजप-तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये केंद्रीय मंत्र्यासमोर भररस्त्यात हाणामारी; घटनेचा Video Viral

BJP TMC Supporters Fight: केंद्रीय गृह राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक आणि राज्य सरकारचे मंत्री उदयन गुहा यांच्या उपस्थितीत ही हाणामारी झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करताना एसडीपीओ जखमी झाले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

BJP TMC Supporters Fight: पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक आणि राज्य सरकारचे मंत्री उदयन गुहा यांच्या उपस्थितीत ही हाणामारी झाली. बंगाल पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी रात्री कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा शहरात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) च्या समर्थकांमध्ये झालेल्या चकमक आणि दगडफेकीत काही पोलिसांसह अनेक लोक जखमी झाले.

तृणमूल काँग्रेसचे दिनहाटाचे आमदार आणि ममता सरकारमधील उत्तर बंगालचे विकास मंत्री उदयन गुहा आणि कूचबिहारचे खासदार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी एकमेकांवर हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आहे. मात्र, जेव्हा हाणामारी झाली तेव्हा दोन्ही नेत्यांनी आपण तिथे उपस्थित होते, अशी कबुली दिली आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत घेण्याचे जाहीर केल्यानंतर पश्चिम बंगालमधील हा पहिलाच राजकीय हिंसाचार आहे. अनेकदा प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे समर्थक एकमेकांशी भिडतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करताना एका पोलीस अधिकाऱ्याच्या (SDPO) डोक्याला दुखापत झाली. हाणामारीत अनेक दुकानांचे नुकसान झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या घटनेच्या निषेधार्थ TMC ने बुधवारी सकाळपासून दिनहाटामध्ये 24 तासांच्या बंदची हाक दिली आहे, तर भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचे मंत्री उदयन गुहा यांच्या अटकेच्या मागणीसाठी दिनहाटा पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने या घटनेचा अहवाल मागवला आहे.

तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि 2019 मध्ये कूचबिहार लोकसभा जागा जिंकून केंद्रीय मंत्री बनलेले निसिथ प्रामाणिक यांनी आरोप केला आहे की जेव्हा ते लोकसभा मतदारसंघात प्रचार करत होते तेव्हा उदयन गुहा यांच्या समर्थकांनी कोणत्याही चिथावणीशिवाय त्यांच्या टीमवर हल्ला केला.

केंद्रीय मंत्र्यांच्या आरोपांना उत्तर देताना राज्य सरकारमधील मंत्री उदयन गुहा म्हणाले, मी माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून परतत होतो. प्रामाणिकचा ताफा आला तेव्हा मी रस्त्यावर उभा होतो. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना कोणतीही चिथावणी न देता मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, स्थानिक पोलिसांनी दिनहाटा मार्केट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT