Nathuram Godse esakal
देश

Nathuram Godse : भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देश बनवायचाय; उपमुख्यमंत्र्यांचा घणाघाती हल्ला

भाजप हिंदू राष्ट्राबद्दल बोलतंय, पण आपली विविधता हेच आपलं सौंदर्य आहे, असंही तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलं.

सकाळ डिजिटल टीम

भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचं (Nathuram Godse) राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

पाटणा : बीबीसी कार्यालयातील (BBC Office) आयकर सर्वेक्षणावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचं (Nathuram Godse) राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

असं करून केंद्र सरकारला संदेश द्यायचा आहे की, जो कोणी सरकारविरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. तेजस्वी यादव म्हणाले, 'बीबीसीचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे. गुजरातमध्ये काय झालं हेही सर्वांना माहीत आहे. भाजपला महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) देश नथुराम गोडसेच्या देशात बदलायचा आहे.'

भाजप हिंदू राष्ट्राबद्दल बोलतंय, पण आपली विविधता हेच आपलं सौंदर्य आहे, असंही तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी जेडीयू नेते सुनील सिंग यांनी बीबीसी कार्यालयात सुरु असलेल्या कारवाईविरोधात केंद्र सरकारला धारेवर धरलं आणि ही कारवाई सूडाच्या राजकारणाचा भाग असल्याचं म्हटलं.

ते म्हणाले, 'बीबीसीवर आयटीच्या छाप्यावरून दिसून येतं की, केंद्र सरकार राजकीय सूडबुद्धीसाठी आयकर, सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे. बीबीसी ही एक प्रेस आहे आणि प्रेस हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ही कारवाई म्हणजे लोकशाहीवर हल्ला असून त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: महाराष्ट्रात इंधन संकटाचा स्फोट! पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा, अनेक पंपावर ‘नो स्टॉक’ बोर्ड, वाहनचालकांचे हाल

IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

Hasan Mushrif Gokul Milk Trap : अजित दादा गेले मंत्री मुश्रीफ अडकले चक्रव्यूहात, ‘गोकुळ’मधील किरकोळ चुका बनल्या गंभीर ; ईडी पुन्हा लागणार मागे?

CSK: मुंबईला त्यांच्याच भाषेत उत्तर! CSK ने रचला इतिहास जो कोणत्याही टीमला जमला नाही; 'या' बाबतीत चेन्नई ठरली नंबर १

Nagpur News: बारावीच्या परीक्षेत ‘मास कॉपी’; वर्धा, गोंदिया जिल्ह्यातील २४३ विद्यार्थ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT