केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  esakal
देश

Amit Shah : भाजपला उत्तर प्रदेशात गतवेळपेक्षा जास्त जागा मिळतील - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

गतवेळी उत्तर प्रदेशात भाजपने ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात गतवेळपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. दरम्यान, ओडिशातील बिजू जनता दलासोबत युती करायची की नाही, याचा अंतिम निर्णय भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा हे घेतील, असे शहा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीचा पुरस्कार करणाऱ्या पक्षांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. गतवेळी उत्तर प्रदेशात भाजपने ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीवेळी हा आकडा ६२ पर्यंत खाली आला होता. मात्र आगामी निवडणुकीत पक्षाला गतवेळपेक्षा जास्त जागा मिळतील, असे शहा म्हणाले. निवडणूक रोख्यांचा संदर्भ देत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप म्हणजे जगातले सर्वात मोठे वसुली रॅकेट असल्याची टीका केली होती. गांधी यांच्या या विधानाचा शहा यांनी समाचार घेतला.

‘’भाजपने रोख्यांच्या माध्यमातून पैसे घेतले तर त्याला वसुली म्हटली जाते. मग कॉंग्रेसने जो पैसा रोख्यांच्या माध्यमातून घेतला, त्याला 'हप्ता वसुली' म्हणायचे काय, असे सांगत शहा पुढे म्हणाले की, रोख्यांचा संपूर्ण तपशील जेव्हा बाहेर येईल, तेव्हा ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी द्यायची पद्धत बंद झाली तर राजकारणात पुन्हा काळा पैसा येईल, अशी आपणास भीती आहे.’’

बीजेडीसोबतच्या आघाडीचा निर्णय नड्डा घेतील

बिजू जनता दलासोबत युती करायची की नाही, याचा अंतिम निर्णय भाजपाध्यक्ष नड्डा घेतील. ओडिशामध्ये भाजपची शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याची वेळ आली तरी पक्ष त्यासाठी तयार आहे, असे शहा म्हणाले. पंजाबमधील अकाली दलासोबत युती करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT