budget 2021 nirmala sitharaman pm modi 
देश

भाजप बजेटचीही करणार जाहिरातबाजी; नेत्यांना दिलेत आदेश ​

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला सादर केला. या अर्थसंकल्पाचे फायदे जनतेला सांगण्यासाठी आता भाजप मोहिम सुरू करणार आहे. यासाठी भाजपकडून देशभरात मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय मंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांना देशाच्या सर्व राज्यातील राजधानी आणि मोठ्या शहरांमध्ये पत्रकार परिषद आणि सभा घेण्याचे आदेश दिले आहेत.

अर्थसंकल्पावर भाजपची ही मोहिम 6-7 फेब्रुवारी आणि 13 -14 फेब्रुवारीला राबवली जाणार आहे. सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते 6-7 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतील. तर देशव्यापी मोहिमेमध्ये चर्चासत्र, एफआयसीसीआय आणि चेंबर ऑफ कॉमर्ससह औद्योगिक क्षेत्रातील लोकांसोबत चर्चा केली जाणार असल्याचं वृत्त न्यूज 18 ने दिलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या सर्व खासदारांना फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास सांगितलं आहे. त्यामध्ये जनतेला अर्थसंकल्पाचे फायदे सांगण्याचे आदेश दिले आहेत. या कार्यक्रमातून बाजपच्या नेत्यांना अर्थसंकल्पातील तरतुदी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय आहे. 

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  कौतुक केलं होतं. कोरोनाच्या संकटकाळातील हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचं व्हिजन असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. शेतकऱ्यांच्या हितासाठी अर्थसंकल्पात अनेक तरतुदी आहेत. त्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला असून बाजारसमित्यांना आणखी बळ मिळेल अशी तरतूद केली असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

IND vs AFG, 2nd ODI : शुभमन गिल - ईशान किशनची वादळी शतके! भारतीय संघ चारशे धावा पार अन् विश्वविक्रमाची बरोबरी

RBI Recruitment: विनापरीक्षा लाखो रुपयांची नोकरी, फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; आरबीआयच्या भरतीसाठी अर्ज कसा करणार?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली

पैसे मिळाले तर पुन्हा बैलासमोर नाचशील का? क्षणाचाही विचार न करता गौतमी पाटीलने दिलं उत्तर, म्हणते- भाई...

SCROLL FOR NEXT