booster dose Government will take a big step on booster dose
देश

परदेशात जाणाऱ्यांना तीन महिन्यानंतर मिळणार बूस्टर डोस

दुसऱ्या डोस नंतर आता परदेशात जायचं असेल तर बूस्टर डोस तीन महिन्यात घेता येणार आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : परदेशात जाण्यासाठी आता केंद्र सरकारकडून बूस्टर डोस घेण्यासाठी सवलत देण्यात येत आहे. दुसऱ्या डोसनंतर आता परदेशात जायचं असेल तर बूस्टर डोस तीन महिन्यात घेता येणार आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने पत्रक काढून माहिती दिली आहे.

(Booster Dose For Foreign Travel)

कोरोना लसीच्या दोन डोसनंतर बूस्टर डोस घेण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. पण आता परदेशी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारकडून सवलत देण्यात आली असून ६ महिन्याऐवजी ३ महिन्याच्या कालावधीनंतर बूस्टर डोस घेता येणार आहे.

यासंदर्भात भारतीय आरोग्य मंत्रालयाने पत्रक काढलं आहे. त्यामध्ये परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना परदेशात प्रवास करण्यासाठी बूस्टर डोस अनिवार्य करण्यात आला आहे. दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोस साठी नऊ महिने थांबावं लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यानंतर बूस्टर डोस घेण्यासाठीचा कालावधी ३ महिने करण्यात आल्यानंतर आता या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

परदेशात प्रवास करणारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थी आता प्रवास करणाऱ्या देशाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाचा बूस्टर डोस घेऊ शकणार आहेत. यासाठी लवकरच CoWIN पोर्टलवर नव्याने सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं होतं. त्यानंतर पत्रक काढून बूस्टर डोस घेण्यासाठीचा कालावधी कमी करण्यात आला आहे.

दरम्यान काल आरोग्यमंत्री मांडविया म्हणाले होते की, ज्यांना दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत ते बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असणार आहेत. याआधीदेखील याबाबत चर्चा करण्यात आली होती. तसेच NTAGI समितीने शिफारस केली होती की, ज्या नागरिकांना विदेशात प्रवास करण्याची गरज आहे त्यांना बूस्टर डोस घेण्याची गरज आहे असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता बूस्टर डोस घेण्यासाठीचा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्यांना ६ महिन्याची प्रतीक्षा कमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

SCROLL FOR NEXT