Born To Foreigner Cant Be Patriot Pragya Thakur Targets Rahul Gandhi
Born To Foreigner Cant Be Patriot Pragya Thakur Targets Rahul Gandhi 
देश

साध्वी प्रज्ञासिंह यांचे राहुल गांधी यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह; म्हणाल्या...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही असं म्हटलं आहे. भोपाळमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच साध्वी प्रज्ञासिंह यांनी अशा प्रकारची टीका करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, चाणक्य यांनी फक्त भुमिपूत्रच आपल्या मातृभूमीचं रक्षण करु शकतो असं सांगितलं होतं, त्यामुळे परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेल्या व्यक्ती देशभक्त असू शकत नाहीत. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली आहे. काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचं नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करु शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 
-----------
'या' देशाचा भारताला पाठिंबा; हिंद महासागरामध्ये केला एकत्रित युद्धसराव
-----------
सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
-----------
दरम्यान, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून मध्य प्रदेश काँगेस प्रवक्ता जे पनी धनोपिया यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मानसिक तोल ढासळला असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजप नेत्यांनी त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत असा सल्लाही दिला आहे. याआधी भोपाळमधील कार्यक्रमात बोलताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याल जडलेल्या शारीरिक व्याधींसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचं सरकार असताना नऊ वर्षे तुरूंगात होते. या काळात तुरूंगात छळ करण्यात आला. त्यामुळे मला अनेक गंभीर दुखापती झाल्या, ज्या अजूनही कायम असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT