देश

एवढ्या भिषण अपघातातही ते दोघे बचावले

सकाळवृत्तसेवा

उटी : तामिळनाडूतील उटी कलहट्टी रस्त्यावर चेन्नईतील पर्यटकांच्या कारला भिषण अपघात झाला होता. यात कारमधील पाच जणांना जागीच जीव गमवावा लागला. या कारमध्ये एकूण सात पर्यटक होते. या दुर्दैवी घटनेत एक आश्चार्यकारक घटनाही घडली. सात पैकी कारमधील दोन व्यक्ती बचावल्या असून घटनेच्या तब्बल दोन दिवसांनी त्यांचा तपास लागला आहे.

चेन्नईतून पर्यटनासाठी आलेल्या सात पर्यटकांच्या कारला 30 सप्टेंबर ला उटी कलहट्टी रस्त्यावर अपघात झाला होता. या अपघातात कार 60 फुट खोल दरीत जाऊन पडली होती. हे सर्व पर्यटक उटी मधील हॉटेलवर उतरले होते. रात्र झाली तरी यांच्यातील कोणीच हॉटेलवर परत न आल्याने हॉटेल प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर या पर्यटकांच्या कार ला अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. 

या अपघातात बचावलेले दोघेजन कारमध्येच अडकून पडले होतो. अपघातात सात पौकी पाच जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, मृतदेहांमध्ये अडकल्यामुळे त्या दोघांनाही बाहेर पडता येत नव्हते. या अपघाताचा शोध पोलिसांनी घेतल्यानंतर त्यांच्या कार निदर्शनास पडली. दरीत जाऊन कारची पाहणी करताना दोन व्यक्ती जिवंत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांना तातडीने उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. एवढ्या भीषण अपघातातही वाचलेल्या दोघांविषयी पोलिसांनसह सगळ्यांकडूनच आश्चर्य व्यक्त होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT