India-and-China 
देश

सीमावादावरून भारताकडून गुंतागुंत वाढू नये 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - सीमावादासाठी चीनने भारतावर ठपका ठेवताना यात भारत आणखी गुंतागुंत वाढविणार नाही, असा शहाजोगपणाचा सल्ला दिला आहे. भारत चीन सीमेवरील तणाव दीर्घकाळ राहण्याची शक्यता वर्तविणाऱ्या बातम्यांवर ही प्रतिक्रिया देताना चीनने सूचक शब्दांत, तडजोडीची जबाबदारी भारतावर असल्याचे म्हटले आहे. तसेच, दोन्ही देश लष्करी आणि राजनैतिक पातळीवर संवाद साधण्यात प्रयत्नशील असल्याचेही चीनने म्हटले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लडाख भागात चीनी सैन्याच्या घुसखोरीनंतर दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणाव वाढला असून सीमेवर सैन्य आमने सामने उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर चीनी वकिलातीचे प्रवक्ते जी रोंग यांनी काल रात्री उशिरा याबाबतचे वक्तव्य जारी करताना भारत सीमावादावर गुंतागुंत वाढविणार नाही आणि परिस्थिती आणखी बिघडेल अशी कारवाई देखील करणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यातून सीमाभागात शांतता आणि स्थितता राखण्यासाठी त्याचप्रमाणे द्विपक्षीय संबंधांच्या विकासातून अनुकूल वातावरण तयार होईल. सद्यस्थितीत भारत-चीन सीमेवरील तणाव घटला असून परिस्थिती सुधारत असल्याची पुस्ती देखील चीनी प्रवक्त्याने जोडली आहे. 

चीनी घुसखोरी आणि १५ जूनला झालेल्या हिंसक झटापटीत २० भारतीय जवानांच्या मृत्यूनंतर वातवरण तापले असून लष्करी आणि राजनैतिक पातळीवर दोन्ही देशांमध्ये बातचित झाली असली तरीही त्यातून ठोस निष्कर्ष निघालेला नाही. 

मोक्याच्या ठिकाणी अजूनही चिनी सैन्य
चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात, पॅंगॉग त्सो सरोवराच्या परिसरात काही भागांमधून सांकेतिक माघार घेतली असली तरी मोक्याच्या ठिकाणी अजूनही चिनी सैन्य तैनात असून शस्त्र सामग्रीची देखील जमवाजमव करण्यात आली आहे. तर, संपूर्ण ताबारेषेवरून चिनी सैन्याने माघार घ्यावी आणि मे पूर्वीची यथास्थिती कायम करावी, या मागणीवर भारत ठाम आहे. एवढेच नव्हे तर चिनी सैन्याच्या दुःसाहसाला आळा घालण्यासाठी तुल्यबळ सैन्य तैनाती भारतानेही पूर्व सीमेवर केली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT