Boy commits suicide after losing PUBG game in andhra pradesh Boy commits suicide after losing PUBG game in andhra pradesh
देश

रात्री जेवण करून खोलीत गेलेला मुलगा सकाळी बाहेर आलाच नाही; नंतर...

सकाळ डिजिटल टीम

आंध्र प्रदेशमध्ये पब्जी (PUBG) गेम गमावल्यानंतर एका मुलाला इतका त्रास झाला की त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हे प्रकरण मछलीपट्टणम जिल्ह्यातील आहे. १६ वर्षीय मुलाने पब्जीची एक फेरी गमावल्यानंतर जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. (Boy commits suicide after losing PUBG game in andhra pradesh)

मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी वडिलांसोबत नातेवाइकांच्या घरी आला होता. आई-वडील अनेक वर्षांपासून वेगळे राहत असल्याने मुलाने वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या मृत्यूनंतर आई खूप अस्वस्थ आहे. ११ जून रोजी मुलगा भावांसोबत पब्जी गेम खेळला होता. एक फेरी गमावल्यानंतर भावांनी त्याची चेष्टा केली.

मुलाला अस्वस्थ पाहून वडिलांनी गेम खेळण्यास (PUBG) मनाई केली. यामुळे मुलाला आणखी नैराश्य आले. रात्री जेवण करून मुलाने खोलीचा दरवाजा बंद केला. रविवारी सकाळी वडिलांनी दरवाजा ठोठावला असता आवाज आला नाही. बराचवेळ वाट पाहिल्यानंतर दरवाजा तोडला असता खोलीत मुलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

यापूर्वी मुलाने केली होती आईची हत्या

ऑनलाइन गेम खेळण्यास मनाई केल्यामुळे १६ वर्षीय मुलाने आईची हत्या (Murder) केली. अल्पवयीन मुलाने वडिलांच्या रिव्हॉल्वरने आईवर गोळी झाडली. त्यानंतर त्याने आईचा मृतदेह तीन दिवस खोलीत लपवून ठेवला. ही घटना उघडकीस येताच वडील तर चक्रावून गेले आणि पोलिसांनाही धक्का बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT