Bride did the firing in uttar pradesh Bride did the firing in uttar pradesh
देश

तमंचे वाली दुल्हनिया : सासरी पोहोचताच नववधूने केला गोळीबार

सकाळ डिजिटल टीम

लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूचे (Bride) वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाते. प्रत्येक राज्यात स्वागताची वेगवेगळी पद्धत असते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नववधू सासरच्या घरी पोहोचली. आत जाण्यापूर्वी तिने पिस्तुलाने हवेत गोळीबार (firing) केला. गोळीबार केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील खंडौली येथील नाऊ सराई येथे घडला. (Bride did the firing in uttar pradesh)

प्राप्त माहितीनुसार, सोढी नावाच्या तरुणाचे तीन दिवसांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर वधू सासरच्या घरी पोहोचली. प्रवेशापूर्वी सोढीने पत्नीचा घरातील प्रवेश संस्मरणीय करण्यासाठी नवीन पद्धत अवलंबली. त्याने बंदूक मागवून नवविवाहित वधूकडे दिली. यानंतर पतीने नवविवाहित (Bride) पत्नीला गोळीबार करण्यास सांगितले.

गोळीबार करताना पतीने पत्नीचा हात धरला होता. त्यानंतर हवेत गोळीबार (firing) केला. यानंतर वधूला घरात प्रवेश देण्यात आला. नंतर घरातील इतर महिलांनी रीतिरिवाजानुसार वधूचा घरात प्रवेश केला.

सासरी पोहोचलेल्या वधूने (Bride) हवेत गोळीबार केला तेव्हा पतीही सोबत होता. तिनेही पिस्तूल घेऊन आवेशात गोळीबार केला. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस कारवाई करण्याची तयारी करीत आहे. नववधूला गोळीबार करताना पाहून लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT