Bride refuses to marry
Bride refuses to marry Bride refuses to marry
देश

होणाऱ्या सासूचे शब्द ऐकून वधूने भर मंडपात दिला लग्नास नकार

सकाळ डिजिटल टीम

लग्न सुरू असताना वराच्या आईने वधूच्या कानात काही शब्द बोलले. यानंतर संतप्त झालेल्या वधूने लग्न करण्यास नकार (Bride refuses to marry) दिला. वधूने लग्नास नकार दिल्यानंतर वराला आल्या पावली परत जावे लागले. हा प्रकार उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील डवंक चौकी भागातील डोहरी गावात घडला. (Bride refuses to marry)

प्राप्त माहितीनुसार, पारस बियार यांच्या मुलीचे लग्न चंदौली जिल्ह्यातील त्रिभवनापूर गावातील लल्लू बियार यांचा मुलगा सुनील कुमार याच्यासोबत ठरले होते. ठरलेल्या दिवशी वराकडील मंडळी वरात घेऊन वधूच्या दारात पोहोचले. त्यांचे जल्लोषात स्वागतही करण्यात आले. यानंतर लग्न लावण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, सिंदूर लावण्यापूर्वी वराची आई मुन्नीदेवीने वधूच्या कानात सांगत ‘५० हजार रुपये आणि दुचाकी’ची मागणी केली. हुंडा न दिल्यास लग्न थांबवण्याची धमकी दिली. वधूच्या बाजूच्या लोकांनी वराकडच्या लोकांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, वराच्या बाजूच्या लोकांनी हुंडा न दिल्यास लग्न करण्यास नकार (refuses to marry) दिला.

यानंतर संतप्त झालेल्या वधूने (Bride) लग्न करण्यास नकार दिला. त्याचवेळी वराच्या मंडळीच्या वर्तणुकीमुळे संतापलेल्या वधू पक्षाने लग्न मंडपात वऱ्हाड्यांना बंधक बनवले. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून वराकडी मंडळीने लग्न करण्यास तयारी दर्शवली. मात्र, वधूने लग्नास नकार दिला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही पक्षांना शांत केले. मात्र, वराला वधूशिवाय परतावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT