bride runs away with boyfriend groom marries minor sister 
देश

लग्नात ट्विस्ट : नवरी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली; लहान बहिणीशी लावले लग्न

सकाळ डिजिटल टीम

भवानीपटना (ओडिशा) : देशात अजूनही अनेक ठिकाणी बाल विवाह होतात. पोलिस यंत्रणा कितीही सक्षम केली तरी, बालविवाह रोखण्यात बरेच अडथळे येतात. परंतु, ओडिशामध्ये एका लग्नात खूपच मोठा ट्विस्ट आला आणि त्यातून एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावण्यात आलं. पोलिसांना वेळीच याची माहिती मिळाली आणि त्यांनी अल्पवयीन मुलीची सुटका केली. पण, लग्नातल्या त्या ट्विस्टची चर्चा मात्र गावातच नव्हे तर, देशभर सुरू आहे.

ओडिशातील कलाहांडी जिल्ह्यात मालपाडा गावात एका लग्नाची तयारी सुरू होती. सगळं सुरळीत चाललेलं. लग्नाच्या मांडवात नवरा मुलगा नवरीची वाट पाहत होता. पण, नवरी काही येईना. ऐनवेळी नवरी मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. त्यानंतरही वधू लग्न मांडवात परत येईल, या आशेवर नवरा मुलगा होता. पण, वाट पाहूनही मुलगी आली नाही. वराकडची मंडळी संतापली. लग्नाच्या मांडवात वादावादी सुरू झाली. त्यात नवरी मुलगीच्या धाकट्या बहिणीशी मुलाचं लग्न लावण्याचा निर्णय झाला. ऐनवेळेला धाकट्या मुलीला तयार करण्यात आलं आणि लग्नही लावून दिलं. याची माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हा प्रशासनातील कर्मचारी, नवऱ्या मुलाच्या घरी पोहोचले आणि त्यांनी अल्पवयीन मुलीची तातडीने सुटका करून दिली. याप्रकरणी बाल संरक्षण अधिकारी पुढील कारवाई करत आहेत.

दहावीची परीक्षा तोंडावर
ज्या मुलीचं लग्न लावण्यात आलं ती शाळेत शिकत होती. सध्या दहावीत असलेल्या त्या मुलीची परीक्षा तोंडावर आली असतानाच हा लग्नाचा घाट घालण्यात आला होता. परंतु, जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्या मुलीची सुटका केल्यामुळं ती आता पुढील शिक्षण घेणार असल्याची माहिती आहे.

बालविवाहाची माहितीच नाही!
जिल्हा प्रशासनाच्या बाल संरक्षण विभागाकडून आणि पोलिसांकडून कारवाई होत असताना, एक धक्कादायक बाब स्पष्ट झाली. ज्या मुलीचं लग्न लावण्यात आलं होतं. त्या मुलीच्या पालकांना, बालविवाह हा गुन्हा आहे, याचीच मुळात माहिती नसल्याचं स्पष्ट झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT