A visual representation of BSNL network infrastructure symbolizing the upcoming 3G shutdown and its impact on millions of BSNL mobile users.

 
esakal
देश

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

BSNL Network Update News : जाणून घ्या, नेमकी कोणती सेवा बीएसएनल बंद करणार आहे आणि ही सेवा वापरणाऱ्या लाखो ग्राहकांना आता काय करावं लागेल?

Mayur Ratnaparkhe

BSNL to Shut Down 3G Services Soon : जर तुमच्याकडे बीएसएनएल सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बीएसएनएलने अलीकडेच देशभरात 4G सेवा सुरू केल्या आहेत आणि आता 5G आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, बीएसएनएलने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बीएसएनएल 3G सेवा बंद करत असल्याची माहिती समोर येत आहेत. 5Gवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यासाठी तयारी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत आहे. असे मानले जाते की या हालचालीमुळे कंपनीला तिचे नेटवर्क कव्हरेज वेगाने वाढवता येईल. 

याशिवाय, अशीही माहिती समोर येत आहे की, बीएसएनएल नोकिया आणि चिनी कंपनी ZTEसोबतचा आपला तो करार संपुष्टात आणण्याची योजना आखत आहे, ज्या अंतर्गत दोन्ही कंपन्या 3G नेटवर्क मेंटन्स करते.

अशावेळी जर तुमच्याकडे BSNL 3G सिम असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या जवळच्या BSNL सेवा केंद्राला किंवा BSNL कार्यालयाला भेट द्यावी. तुम्ही तुमचे 3G BSNL सिम ताबडतोब 4G वर अपग्रेड करावे. प्राप्त माहितीनुसार, कंपनीने 10 डिसेंबर रोजी सर्व मंडळांमध्ये 3G सेवा बंद करण्याबाबत जनरल मॅनेजर्सना पत्र देखील पाठवले आहे.

शिवाय, सरकारी मालकीची बीएसएनल नेहमीच  तिच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण रिचार्ज प्लॅन सादर करत असते. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएल अजूनही खूपच स्वस्त रिचार्ज प्लॅन देते. तसेच बीएसएनएलने गेल्या काही वर्षांत तिच्या ग्राहकांच्या सोयीसाठी नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी वेगाने काम केले आहे.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT